tharala tar mag sakshi shikhare ketaki palav exit marathi serial update : ‘ठरलं तर मग’ ही लोकप्रिय मराठी मालिका गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं असून, अर्जुन आणि सायलीसोबतच खलनायकी भूमिका देखील तितक्याच चर्चेत राहिल्या. विशेषतः साक्षी शिखरे या पात्राने मालिकेच्या कथानकाला वेगळी धार दिली. आता मात्र या भूमिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. साक्षीची भूमिका साकारणारी अभिनेत्री केतकी पालव लवकरच मालिकेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा अधिकृतरित्या स्पष्ट झाली आहे.
सुरुवातीच्या भागांमध्ये साक्षी शिखरेची भूमिका अभिनेत्री मीरा जगन्नाथ साकारत होती. त्यानंतर ही भूमिका केतकी पालवकडे आली आणि अल्पावधीतच तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या अभिनयातील आत्मविश्वास, डायलॉग डिलिव्हरी आणि नकारात्मक भूमिकेतील प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स यामुळे साक्षी शिखरे हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. मालिकेतील प्रत्येक महत्त्वाच्या ट्विस्टमध्ये या पात्राची उपस्थिती जाणवत राहिली.
गेल्या काही दिवसांपासून मालिकेत साक्षी आपली ओळख बदलण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेणार असल्याचं दाखवलं जात आहे. त्यामुळे पुढील भागांमध्ये पात्राचा चेहरा बदलणार आणि त्याचबरोबर मालिकेत नवीन अभिनेत्रीची एन्ट्री होणार, असा अंदाज प्रेक्षकांनी आधीच बांधला होता. आता केतकी पालवने स्वतः मालिका सोडत असल्याचं सांगितल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
एका मुलाखतीत बोलताना केतकीने मालिका सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलं. तिने सांगितलं की, वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळताना मोठी कसरत करावी लागत होती. तिची सात वर्षांची मुलगी असून तिला कुटुंबासाठी अधिक वेळ द्यायचा आहे. याशिवाय तिच्या नाटकांचे प्रयोग वाढल्यामुळे शूटिंग आणि दौरे एकत्र सांभाळणं कठीण होत होतं. त्यामुळे बराच विचार करून तिने हा निर्णय घेतला.
केतकीने मालिकेच्या संपूर्ण टीमबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. सेटवर नेहमी सकारात्मक वातावरण असायचं आणि प्रत्येकाने तिला खूप सहकार्य केलं असं ती म्हणाली. मालिकेच्या यशामागे संपूर्ण टीमवर्क महत्त्वाचं असल्याचंही तिने नमूद केलं. त्यामुळे आता ती मालिकेतील कलाकार आणि सेटवरील वातावरण मिस करणार असल्याचं तिने भावनिक शब्दांत सांगितलं.
हे पण वाचा.. एकाच मालिकेत दोन दमदार हिरोंची एन्ट्री! शुभंकर तावडे आणि आशय कुलकर्णी साकारणार ऑनस्क्रीन भावांची भूमिका
tharala tar mag sakshi shikhare ketaki palav exit marathi serial update
दरम्यान, आता प्रेक्षकांचं लक्ष एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे लागलं आहे. केतकी पालवच्या जागी साक्षी शिखरेची भूमिका कोण साकारणार? तसेच साक्षीची खरी ओळख अर्जुन आणि सायलीसमोर कशी उघड होणार? या सर्व घडामोडींमुळे आगामी भागांविषयी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
हे पण वाचा.. स्टार प्रवाहवरील ‘पाठराखीण’ मालिकेत शुभंकर तावडेची एन्ट्री









