ADVERTISEMENT

स्टार प्रवाहवरील ‘पाठराखीण’ मालिकेत शुभंकर तावडेची एन्ट्री

shubhankar tavade prajakta gaikwad pathrakhin star pravah serial : ‘स्टार प्रवाह’वरील नव्या ‘पाठराखीण’ मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या कमबॅकसोबतच अभिनेता शुभंकर तावडे मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे आणि त्यांचा मुलगा शुभंकर हे आता एकाच वाहिनीवरील मालिकांमध्ये दिसणार आहेत.
shubhankar tavade prajakta gaikwad pathrakhin star pravah serial

shubhankar tavade prajakta gaikwad pathrakhin star pravah serial : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या १ जूनपासून सुरू होणारी ‘पाठराखीण’ ही नवी मालिका सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासूनच कथानक आणि कलाकारांबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. आता या मालिकेतील मुख्य अभिनेत्याचा चेहरा समोर आल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. लोकप्रिय अभिनेता शुभंकर तावडे या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार असून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडसोबत त्याची ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळणार आहे.

प्राजक्ता गायकवाड या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. त्यांच्या जोडीला अभिनेत्री गौरी इंगवलेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकेत या दोघी बहिणींच्या भूमिकेत झळकणार असल्याचं यापूर्वी स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, मालिकेतील नायक कोण असणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अखेर वाहिनीने नव्या प्रोमोद्वारे शुभंकर तावडेच्या एन्ट्रीची घोषणा केली.

‘तो खवळलेल्या समुद्रासारखा आणि ती शांत नदीसारखी…’ अशा हटके ओळींसह शेअर करण्यात आलेल्या प्रोमोने सोशल मीडियावर चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे. अनेक वर्षांनंतर शुभंकर तावडे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्यामुळे त्याचे चाहते विशेष आनंदी आहेत. याआधी तो ‘फ्रेशर्स’ या लोकप्रिय मालिकेत झळकला होता. त्यानंतर त्याने चित्रपटांकडे मोर्चा वळवला आणि अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटातही त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

विशेष म्हणजे शुभंकर हा ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांचा मुलगा आहे. सध्या सुनील तावडे ‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. त्यामुळे आता तावडे बापलेक एकाच वाहिनीवर वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने मनोरंजनविश्वात याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, ‘पाठराखीण’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अभिनेत्री अदिती देशपांडे यांनीही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील त्यांच्या ‘जीजी आक्का’ या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. आता त्या या नव्या मालिकेत शुभंकर तावडेच्या आईच्या भूमिकेत दिसणार असल्याचं प्रोमोमधून स्पष्ट झालं आहे. त्यांच्या भूमिकेमुळे मालिकेत आणखी रंगत येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

हे पण वाचा.. मी सुंदर नाही असंच वाटायचं…; अशोक सराफांच्या एका सल्ल्याने बदलला निवेदिता सराफ यांचा आत्मविश्वास

shubhankar tavade prajakta gaikwad pathrakhin star pravah serial

‘पाठराखीण’ या मालिकेची निर्मिती सोहम प्रोडक्शनतर्फे करण्यात येत असून मालिकेचा विषय, कलाकारांची निवड आणि प्रोमोमधील सादरीकरण यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या १ जूनपासून रात्री ९ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नव्या कथानकासह ती टीआरपीच्या शर्यतीत कितपत यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे पण वाचा.. सासूला सुनेनं दिलं थेट चॅलेंज! ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये रंगणार जबरदस्त सामना