ADVERTISEMENT

सासूला सुनेनं दिलं थेट चॅलेंज! ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये रंगणार जबरदस्त सामना

savlyachi janu savali savali tilottama faceoff new promo zee marathi : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत आता कथेला नवं वळण मिळणार आहे. अनेक वर्षांनी सावली आणि तिलोत्तमा आमनेसामने येणार असून गुरूकुलाच्या जागेवरून दोघींमध्ये संघर्ष रंगणार आहे. सावलीने दिलेल्या खुल्या आव्हानामुळे मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता वाढली आहे.
savlyachi janu savali savali tilottama faceoff new promo zee marathi

savlyachi janu savali savali tilottama faceoff new promo zee marathi : ‘सावळ्याची जणू सावली’ या लोकप्रिय मालिकेत सध्या प्रेक्षकांना भावनिक आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी मालिकेत दाखवण्यात आलेल्या लीपनंतर कथानकाने पूर्णपणे वेगळं वळण घेतलं असून आता सावली आणि तिलोत्तमा यांच्या संघर्षाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.

कथेनुसार, सावली गरोदर असताना तिलोत्तमाने गैरसमजातून तिचा अपमान करत तिला घराबाहेर काढलं होतं. त्या वेळी सारंगलाही पत्नीच्या बाजूने ठामपणे उभं राहता आलं नव्हतं. याच गोष्टीची खंत त्याच्या मनात अनेक वर्षांपासून कायम आहे. मेहेंदळे कुटुंबापासून दूर झाल्यानंतर सावलीने स्वतःचं आयुष्य नव्याने उभं करण्याचा निर्णय घेतला. पुढे तिला जुळी मुलं झाली, मात्र परिस्थिती आणि राजकुमारच्या कारस्थानामुळे तिची मुलगी तिच्यापासून दूर गेली.

सध्या सावली आपल्या मुलगा अबीरसोबत राहत असून त्याचा सांभाळ ती एकटी करत आहे. दुसरीकडे ओवी सारंगसोबत वाढत असली तरी तिची खरी ओळख अजून कोणालाच समजलेली नाही. अनेक वर्षं दूर राहिल्यानंतर आता सावली पुन्हा एकदा आपल्या सासरच्या लोकांसमोर येणार असल्याने मालिकेतील वातावरण तापणार आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सावली ‘स्वर सावली’ गुरूकुलात लहान मुलांना संगीत शिकवत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र या गुरूकुलाच्या जागेवर तिलोत्तमाची नजर आहे. ती ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. यावेळी जगन्नाथ तिच्यासमोर स्पष्ट शब्दांत सांगतो की, तिचा खरा सामना आता दुसऱ्याच व्यक्तीशी होणार आहे. त्याच वेळी सावलीची दमदार एन्ट्री होते.

सावली तिलोत्तमासमोर ठामपणे उभी राहत म्हणते की, गुरूकुलाची एक वीटही हलू देणार नाही. तिच्या या शब्दांमुळे पुढील भागात दोघींमध्ये मोठा संघर्ष रंगणार हे स्पष्ट झालं आहे. तिलोत्तमा आता ही जागा मिळवण्यासाठी कोणता नवा डाव आखणार आणि सावली त्याला कसं प्रत्युत्तर देणार याकडे प्रेक्षकांचं विशेष लक्ष लागलं आहे.

हे पण वाचा.. करण कुंद्राने तेजस्वी प्रकाशला केलं रॉयल प्रपोज व्हायरल व्हिडिओनंतर चाहत्यांमध्ये लग्नाच्या चर्चांना उधाण

savlyachi janu savali savali tilottama faceoff new promo zee marathi

याशिवाय तिलोत्तमाला अद्याप अबीरबद्दल काहीच माहिती नसल्याने पुढे त्याची ओळख उघड झाल्यावर कथेत आणखी मोठं वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अबीरसमोर आल्यानंतर तिलोत्तमाचं वागणं कसं असेल याबाबतही प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

हे पण वाचा.. निळ्याशार समुद्रात रोमँटिक सुट्टी! प्रिया-उमेशची मालदीव ट्रिप चर्चेत; स्कुबा डायव्हिंगचे फोटो व्हायरल

मालिकेचा हा विशेष भाग २४ मे रोजी प्रसारित केला जाणार असून दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता प्रेक्षकांना तो पाहायला मिळणार आहे. सध्या ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर दुपारच्या स्लॉटमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.