ADVERTISEMENT

करण कुंद्राने तेजस्वी प्रकाशला केलं रॉयल प्रपोज व्हायरल व्हिडिओनंतर चाहत्यांमध्ये लग्नाच्या चर्चांना उधाण

karan kundra proposes tejasswi prakash video viral marriage : तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ‘देसी ब्लिंग’ शोमधील व्हायरल व्हिडिओमध्ये करणने तेजस्वीला गुडघ्यावर बसून प्रपोज केल्याचं दिसत असून, चाहत्यांकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
karan kundra proposes tejasswi prakash video viral marriage

karan kundra proposes tejasswi prakash video viral marriage :  काही दिवसांपासून टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या गुपचूप लग्नाच्या चर्चा रंगल्या असतानाच आता एका नव्या व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘बिग बॉस 15’मधून सुरू झालेली त्यांची प्रेमकहाणी आता पुढच्या टप्प्यावर पोहोचणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘देसी ब्लिंग’ या शोमधील एक खास क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये करण कुंद्रा अतिशय खास अंदाजात तेजस्वी प्रकाशला लग्नासाठी प्रपोज करताना दिसत आहे. पंजाबी स्टाईलमध्ये सजलेला करण गुडघ्यावर बसून तेजस्वीसमोर आपल्या प्रेमाची कबुली देतो आणि तिच्यासमोर मोठी डायमंड रिंग ठेवतो. त्यानंतर तो तिला अंगठी घालतो आणि दोघांमधील भावूक क्षण पाहून चाहत्यांनाही आनंदाचा धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे, तेजस्वीलाही या सरप्राईजची कल्पना नसल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं. करणच्या प्रपोजनंतर ती भावूक झालेली दिसते. डोळ्यांत अश्रू आणत ती त्यांच्या नात्याच्या प्रवासाबद्दल बोलताना म्हणते की, ‘बिग बॉसनंतर अनेकांनी हे नातं टिकणार नाही असं म्हटलं होतं. काहींनी आम्हाला फेक म्हटलं, पण आज आम्ही चार वर्षांपासून एकत्र आहोत.’

करणनेही आपल्या भावना व्यक्त करताना तेजस्वीने त्याच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवला याचा उल्लेख केला. “तू माझ्यासाठी प्रेमाचा अर्थ बदललास,” असं म्हणत त्याने तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. या दोघांच्या केमिस्ट्रीने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, चाहते आता या जोडीकडून अधिकृत लग्नाच्या घोषणेची वाट पाहत आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये “आता तरी लग्नाची तारीख सांगा” अशी मागणी केली आहे. गेल्या चार वर्षांत करण आणि तेजस्वीने अनेक चढ-उतार एकत्र अनुभवले असून, त्यांच्या नात्याची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगत आली आहे.

हे पण वाचा.. निळ्याशार समुद्रात रोमँटिक सुट्टी! प्रिया-उमेशची मालदीव ट्रिप चर्चेत; स्कुबा डायव्हिंगचे फोटो व्हायरल

karan kundra proposes tejasswi prakash video viral marriage

‘देसी ब्लिंग’ शोचं शूटिंग दुबईमध्ये झाल्याचं सांगितलं जात असून, व्हायरल होणारा हा खास प्रपोजल व्हिडिओही तिथलाच असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या प्रपोजलनंतर दोघे खरोखर लग्नबंधनात अडकणार का, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या चाहत्यांसाठी हा व्हिडिओ कोणत्याही सरप्राईजपेक्षा कमी नाही.

हे पण वाचा.. प्राजक्ता माळीने शेअर केले ‘कान्स’ मधील खास फोटो