anshuman vichare new car mahindra xev 9s : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारा अभिनेता अंशुमन विचारे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या अभिनय आणि विनोदी शैलीमुळे घराघरांत पोहोचलेल्या अंशुमनने यंदाच्या वर्षी वैयक्तिक आयुष्यात मोठे यश मिळवलं आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन घर खरेदी केल्यानंतर आता त्याच्या कुटुंबात आणखी एका नव्या सदस्याची भर पडली आहे. अभिनेत्याने नुकतीच आलिशान Mahindra XEV 9S ही कार खरेदी केली असून त्याचा आनंद त्याने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अंशुमनने नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत “आमच्या कुटुंबात नवीन सदस्याचं स्वागत” अशा आशयाचं कॅप्शन लिहिलं आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता पत्नी पल्लवी आणि लेकीसोबत शोरूममध्ये गाडीची पूजा करताना दिसत आहे. संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर होताच चाहत्यांनी आणि कलाकारांनी अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
सध्या Mahindra XEV 9S या गाडीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. आकर्षक डिझाईन, आधुनिक फीचर्स आणि दमदार लूकमुळे ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. विविध रिपोर्टनुसार या गाडीची एक्स-शोरूम किंमत जवळपास १९.९५ लाख ते २७.३५ लाख रुपयांदरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अंशुमनच्या या नव्या खरेदीची सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगली आहे.
अभिनेत्याच्या या आनंदाच्या क्षणी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. अभिनेत्री किशोरी अंबिये, रेश्मा शिंदे, रसिका वेंगुर्लेकर, उदय टिकेकर यांच्यासह अनेकांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनीही “खूप छान”, “अभिनंदन”, “आणखी प्रगती करा” अशा प्रतिक्रिया देत अभिनेत्यावरील प्रेम व्यक्त केलं.
दरम्यान, अंशुमन विचारेने मराठी चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवरही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘पोश्टर बॉईज’, ‘धिंगाणा’, ‘संघर्ष’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’, ‘श्वास’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नुकताच तो ‘सालबर्डी’ चित्रपटात झळकला होता. याशिवाय लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटातही तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हे पण वाचा.. ठरलं तर मग’मधील साक्षी शिखरेची एक्झिट! अभिनेत्री केतकी पालव म्हणाली, “हा निर्णय घेणं सोपं नव्हतं…”
anshuman vichare new car mahindra xev 9s
वैयक्तिक आयुष्यातही अंशुमनसाठी हे वर्ष विशेष ठरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने नव्या घरात गणेशपूजन केल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. सध्या त्या घराचं इंटिरियरचं काम सुरू असून लवकरच तो कुटुंबासह नव्या घरात राहायला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. नवीन घरानंतर आता नव्या आलिशान गाडीमुळे अंशुमन विचारेच्या आनंदात आणखी भर पडली आहे.
हे पण वाचा.. एकाच मालिकेत दोन दमदार हिरोंची एन्ट्री! शुभंकर तावडे आणि आशय कुलकर्णी साकारणार ऑनस्क्रीन भावांची भूमिका









