vijay andalkar rupali traditional look at dnyanada ramtirthkar wedding : अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिच्या विवाहसोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार, मित्रमंडळी आणि जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. लग्नातील विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. याचदरम्यान अभिनेता विजय आंदळकर आणि त्याची पत्नी रूपाली यांच्या खास अंदाजाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या ज्ञानदाच्या आयुष्यातील या खास क्षणी अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. विजय आंदळकरने पत्नी रूपालीसह या लग्नाला हजेरी लावत आपल्या पारंपरिक आणि आकर्षक लूकने कार्यक्रमात वेगळीच छाप पाडली. दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नातील सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले असून या फोटोंना प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
रूपालीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो पोस्ट करत “Wedding Diary” आणि “Couple Love” अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोंमध्ये विजय आणि रूपाली यांच्यातील खास बॉन्डिंग स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेष म्हणजे दोघांनी दिलेल्या रोमँटिक पोझ चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरल्या आहेत. एका फोटोमध्ये रूपालीने विजयचा हात पकडत दिलेली पोझ सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आली आहे.
विजय आंदळकरच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर त्याने पांढऱ्या रंगाचा क्लासिक शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचे नेहरू जॅकेट स्टाईल वेस्टकोट परिधान केले होते. त्याचा हा साधा पण रॉयल अंदाज अनेकांना भावला. तर रूपालीने लाईम ग्रीन रंगाची आकर्षक डिझायनर साडी आणि सोनेरी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान करत एलिगंट लूक साकारला होता. पारंपरिक दागिने आणि हलकासा मेकअप यामुळे तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं.
मराठी सेलिब्रिटी लग्नांमध्ये कलाकारांचे फॅशन स्टेटमेंट नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. ज्ञानदा रामतीर्थकरच्या लग्नातही अनेक कलाकारांनी आपल्या वेगळ्या स्टाईलने उपस्थिती लावली, मात्र विजय आणि रूपालीच्या जोडीने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंवर चाहत्यांनी “सुंदर जोडी”, “रॉयल कपल”, “परफेक्ट ट्रेडिशनल लूक” अशा कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
हे पण वाचा.. काजूची बाग, समुद्रकिनारा अन् लालपरीचा प्रवास! अभिजीत सावंतची कोकण ट्रिप चर्चेत
vijay andalkar rupali traditional look at dnyanada ramtirthkar wedding
ज्ञानदा रामतीर्थकरच्या विवाहसोहळ्यातील हे खास क्षण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून मराठी मनोरंजन विश्वात या लग्नाची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
हे पण वाचा.. कान्स २०२६ मध्ये मराठमोळ्या संस्कृतीची झलक! अशोक सराफांच्या नमस्काराने जिंकली चाहत्यांची मनं









