abhidnya bhave mehul pai 40th birthday poem instagram post : हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वात आपल्या दमदार अभिनयामुळे ओळख निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या अभिज्ञाने यावेळी आपल्या पती मेहुल पैच्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत खास आणि भावनिक तसेच मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने पहिल्यांदाच मेहुलसाठी स्वतः कविता लिहिली असून ती सध्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
अभिज्ञा आणि मेहुल यांचे नातं नेहमीच चाहत्यांच्या आकर्षणाचा विषय राहिले आहे. दोघांचे रोमँटिक आणि क्युट फोटो सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. याच दरम्यान मेहुलचा ४० वा वाढदिवस असल्याचे सांगत अभिज्ञाने त्याच्यासाठी खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. “तू नेहमी सर्वांसाठी कविता करतोस, म्हणून आज मी तुझ्यासाठी कविता केली आहे” असे म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
तिने लिहिलेल्या कवितेत प्रेम, मस्ती आणि हलकाफुलका विनोद यांचा सुंदर संगम दिसून येतो. “फोटो काढायला आवडतात पण नखरे भारी करतोस”, “गोड खायला आवडतं पण तब्येतीमुळे खाकरे खावे लागतात” अशा ओळींमधून तिने मेहुलच्या स्वभावाचे मजेशीर वर्णन केले आहे. तसेच तो बाहेरून शिस्तप्रिय वाटत असला तरी घरात मात्र लहान मुलासारखा धुडगूस घालतो, असेही तिने हसत-खेळत सांगितले आहे.
या कवितेच्या शेवटी तिने प्रेम व्यक्त करताना म्हटले की, “In good and mainly bad days, my love for you will be the same.” त्याचबरोबर “आता तरी मोठा हो!” असा हलकाफुलका टोमणा देत तिने पोस्ट अधिकच आकर्षक बनवली आहे.
अभिज्ञाच्या या पोस्टवर चाहत्यांसह मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया देत मेहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात असून अनेकांना तिच्या कवितेतील साधेपणा आणि प्रेमभावना विशेष भावल्या आहेत.
हे पण वाचा.. ज्ञानदा रामतीर्थकरच्या लग्नात विजय आंदळकर-पत्नी रूपालीचा रॉयल लूक
abhidnya bhave mehul pai 40th birthday poem instagram post
अभिज्ञा भावेने “तू तेव्हा तशी”, “खुलता कळी खुलेना” यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या ती झी मराठीवरील “तारिणी” या मालिकेत कौशिकी ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून तिच्या अभिनयाचे कौतुक सातत्याने होत आहे.
हे पण वाचा.. काजूची बाग, समुद्रकिनारा अन् लालपरीचा प्रवास! अभिजीत सावंतची कोकण ट्रिप चर्चेत









