veen doghantali hi tutena swanandi samar love twist promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या लोकप्रिय मालिकेत सध्या भावनांचा वेध घेणारं नवं वळण पाहायला मिळत आहे. मालिकेच्या कथानकात अलीकडेच समरची जुनी मैत्रीण आणि एक्स गर्लफ्रेंड किमयाची एन्ट्री झाली असून, तिच्या आगमनानंतर स्वानंदी आणि समर यांच्या नात्यात सूक्ष्म बदल जाणवू लागले आहेत. मालिकेचा नुकताच समोर आलेला प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
किमया आणि समर यांच्यातील जुनी मैत्री, त्यांचं एकमेकांशी असलेलं कम्फर्टेबल नातं आणि सततची जवळीक हे सगळं स्वानंदीला आतून अस्वस्थ करताना दिसत आहे. मात्र, समरला कोणत्या नात्याने प्रश्न विचारायचा, हा संभ्रम तिच्या मनात कायम आहे. त्यामुळे ती स्वतःच्या भावनांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असली तरी तिच्या मनात समरबद्दल प्रेम निर्माण झाल्याचं आता स्पष्ट दिसू लागलं आहे.
नव्या प्रोमोमध्ये समर आपल्या कामात व्यस्त असताना किमया त्याच्याशी जुन्या आठवणी शेअर करताना दिसते. मात्र समर तिच्याकडे फारसं लक्ष देत नाही. यामुळे चिडलेली किमया त्याचा लॅपटॉप हातात घेते आणि त्यानंतर दोघांमध्ये हलकाफुलका संघर्ष सुरू होतो. याचवेळी स्वानंदी खोलीत येते आणि समर-किमयाला जवळ पाहून तिच्या चेहऱ्यावरचा बदल स्पष्ट दिसून येतो. तिच्या मनात निर्माण झालेली असुरक्षितता आणि मत्सर या प्रसंगातून प्रकर्षाने जाणवतो.
हे पण वाचा.. महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा हटके अंदाज; मेट गालालाही टक्कर देणारे कलाकारांचे लूक चर्चेत!
या प्रोमोमधील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे स्वानंदीचा अंतर्मनातील संवाद. “आपलं नातं तडजोडीचं असलं तरी मन समरच्या प्रेमात पडलंय,” अशी भावना ती व्यक्त करते. इतकंच नाही तर आजपर्यंत ‘मिस्टर राजवाडे’ किंवा ‘राजवाडे’ अशी हाक मारणारी स्वानंदी पहिल्यांदाच समरचं नाव घेताना दिसते. त्यामुळे तिच्या भावना आता अधिक स्पष्ट झाल्याचं प्रेक्षकांना जाणवत आहे.
किमयाच्या एन्ट्रीनंतर मालिकेतील समीकरणं बदलणार हे जवळपास निश्चित झालं आहे. एका बाजूला स्वानंदीच्या मनात प्रेमाची चाहूल लागली असताना दुसऱ्या बाजूला समरला तिच्या भावना केव्हा समजणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. सोशल मीडियावरही या प्रोमोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी किमयाच्या पात्रामुळे कथेला रंगत आल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी स्वानंदी आणि समरची केमिस्ट्री अधिक खुलत असल्याचं नमूद केलं आहे.
हे पण वाचा.. प्राजक्ता गायकवाडने घरी केली सत्यनारायण पूजा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
veen doghantali hi tutena swanandi samar love twist promo
भावनिक गुंतागुंत, नात्यांमधील बदल आणि पात्रांच्या मनातील संघर्ष यामुळे ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. येत्या भागांमध्ये स्वानंदी आणि समरचं नातं नेमकं कोणत्या दिशेने जाणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.









