Tanmay Jakkar Enters Shubh Shravani as Rudrapratap : झी मराठीवरील लोकप्रिय “शुभ श्रावणी” मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील शुभू आणि श्रावणी यांची प्रेमकथा सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. नुकतीच दोघांनीही एकमेकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या असून त्यांच्या नात्याला नवं वळण मिळालं आहे. मात्र, त्यांच्या या प्रेमप्रवासात अनेक अडथळे उभे राहण्याची चिन्हेही स्पष्ट दिसत आहेत.
श्रावणी ही श्रीमंत घरातील आणि शिक्षणमंत्र्यांची मुलगी असल्यामुळे तिच्या आयुष्यावर अनेक बंधने आहेत. तिच्या वडिलांचा तिच्याविषयी असलेला कठोर दृष्टिकोन आणि काही कौटुंबिक कारणांमुळे निर्माण झालेला तणाव, या दोघांच्या नात्यासमोर मोठं आव्हान ठरत आहे. याशिवाय, शुभू-श्रावणीच्या नात्याला विरोध करणारी स्वीटी ही व्यक्तिरेखा आधीपासूनच त्यांच्या आयुष्यात गोंधळ निर्माण करताना दिसते आहे.
अशातच मालिकेत आणखी एका नव्या पात्राची एन्ट्री होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ‘कलर्स मराठी’वरील “लय आवडतेस तू मला” या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता तन्मय जक्का आता “शुभ श्रावणी”मध्ये झळकणार आहे. त्या मालिकेत त्याला ‘सरकार’ म्हणून ओळखलं जात होतं आणि प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयावर भरभरून प्रेम केलं होतं.
हे पण वाचा.. नम्रता संभेरावची प्रसाद खांडेकरसाठी खास वाढदिवस पोस्ट
आता तन्मय जक्का “शुभ श्रावणी”मध्ये रुद्रप्रताप या इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून त्यातील त्याचा दमदार आणि स्टायलिश लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. रुद्रप्रतापच्या एन्ट्रीमुळे मालिकेच्या कथानकात नेमका कसा बदल होणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
रुद्रप्रताप हे पात्र शुभू-श्रावणीच्या आयुष्यात कोणती भूमिका बजावणार? त्यांच्या नात्यात तो अडथळा ठरणार की मदतीचा हात देणार? या प्रश्नांची उत्तरं पुढील भागांमध्ये मिळणार आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर चाहत्यांनी तन्मय जक्काला नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे पण वाचा.. लग्नानंतर होईलच प्रेम मध्ये क्षमा देशपांडेची एन्ट्री पार्थ-काव्याच्या आयुष्यात नवा ट्विस्ट!
Tanmay Jakkar Enters Shubh Shravani as Rudrapratap
“शुभ श्रावणी” ही मालिका रोज सायंकाळी ६.३० वाजता प्रसारित होते आणि प्रेक्षकांकडून तिला सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगामी भागांमध्ये येणारे ट्विस्ट आणि नव्या पात्रामुळे ही कथा आणखी रंगतदार होणार यात शंका नाही.









