ADVERTISEMENT

Video: ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये मोठा ट्विस्ट! ओवीचं होणार अपहरण; संकटात सावलीच्या मदतीला कोण धावणार?

savalyachi janu savali ovi apaharan savali navin twist : 'सावळ्याची जणू सावली' मालिकेच्या आगामी भागात ओवीच्या अपहरणामुळे सावली आणि अबीरसमोर मोठं संकट उभं राहणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये काही गुंड ओवीला जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन जाताना दिसत आहेत. सावली देवाकडे मुलांना वाचवण्यासाठी प्रार्थना करत असतानाच एका रहस्यमय व्यक्तीची झलक पाहायला मिळते.
savalyachi janu savali ovi apaharan savali navin twist

savalyachi janu savali ovi apaharan savali navin twist : ‘सावळ्याची जणू सावली’ या झी मराठीवरील मालिकेच्या कथानकात सध्या एकापाठोपाठ एक धक्कादायक घडामोडी पाहायला मिळत आहेत. सावली आणि सारंग यांच्या आयुष्यातील जुने गैरसमज, वेगळं झाल्यानंतरची वर्षं आणि पुन्हा समोरासमोर आलेले दोघे अशा अनेक घटनांमुळे कथा रंगतदार झाली आहे. आता मात्र सावलीच्या आयुष्यात आणखी एक मोठं संकट येताना दिसत असून, आगामी भागात ओवीच्या अपहरणाचा ट्रॅक पाहायला मिळणार आहे.

मालिकेच्या कथेत तिलोत्तमा, राजकुमार आणि भैरवी यांच्या कारस्थानांमुळे सावली आणि सारंग यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यांच्यातील गैरसमज इतके वाढले की दोघांनी वेगवेगळे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. या काळात राजकुमारने सावली आणि तिच्या मुलांना संपवण्यासाठी गुंडांचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच गोंधळात सावलीपासून तिची मुलगी ओवी दुरावली.

ओवीला त्यावेळी सारंगने वाचवलं होतं. मात्र ती आपलीच मुलगी आहे, याची त्याला कल्पना नव्हती. तरीही त्याने ओवीला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळलं. दुसरीकडे सावलीने अबीरला स्वतःच्या बळावर मोठं केलं. अनेक वर्षांनंतर सावली आणि सारंग पुन्हा एकमेकांसमोर आले असले, तरी त्यांच्या भूतकाळातील गैरसमज अजून पूर्णपणे दूर झालेले नाहीत. मात्र संकटाच्या वेळी दोघेही एकमेकांच्या मदतीला धावून जात असल्याचं मालिकेत दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता समोर आलेल्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. प्रोमोमध्ये सावली आणि अबीर शाळेतून परतत असल्याचं दिसतं. त्याच वेळी अचानक एक गाडी त्यांच्या जवळ येते. गाडीतून काही व्यक्ती खाली उतरतात आणि ओवीला जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतात. काही कळण्याआधीच ते तिला गाडीत बसवून घेऊन जातात.

बहिणीला वाचवण्यासाठी अबीर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो. मात्र गुंड त्याला बाजूला ढकलून देतात. या प्रसंगात अबीर मोठ्याने ओवीला हाक मारताना दिसतो. त्याचा आवाज ऐकून सावली झोपेतून दचकून जागी होते. घडलेल्या प्रकाराची जाणीव होताच तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते. ती आपल्या मुलांना काहीही होऊ नये म्हणून देवाकडे प्रार्थना करते.

हे पण वाचा .. Video: ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये गौरीचा इंदुराणीला सडेतोड जवाब; ‘आईची लायकी’वरून दोघींमध्ये रंगणार मोठा वाद

यानंतर प्रोमोमध्ये एका दगडावर काठी हातात घेतलेली एक रहस्यमय व्यक्ती उभी असल्याची झलक दाखवण्यात आली आहे. ही व्यक्ती नेमकी कोण आहे, याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे ओवीला घेऊन जाणारी गाडीही त्याच परिसरात दिसते. त्यामुळे ओवीच्या अपहरणामागे कोणाचा हात आहे आणि सावलीच्या मदतीला ही रहस्यमय व्यक्ती धावून येणार का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

झी मराठीने या प्रोमोसोबत दिलेल्या संकेतामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सावलीच्या हाकेला तिच्या आराध्य दैवताचा आधार मिळणार का, की या संकटातून तिला एखादी अनपेक्षित व्यक्ती बाहेर काढणार, हे आगामी भागात स्पष्ट होईल. त्यामुळे ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील ओवीच्या अपहरणाचा हा ट्रॅक कथानकाला कोणतं नवं वळण देतो, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

हे पण वाचा.. ‘तारिणी’मध्ये ‘ऑपरेशन तिरंगा’चा थरार! बदललेल्या लूकमध्ये शिवानी सोनार, उदय टिकेकरांची दमदार एन्ट्री

savalyachi janu savali ovi apaharan savali navin twist