ADVERTISEMENT

निवेदिता सराफांचं ५ वर्षांनी कमबॅक; ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार

nivedita saraf lead role in krushnaichya leki : ‘अग्गंबाई सासूबाई’मधील बबड्याची आई म्हणून घराघरांत पोहोचलेल्या निवेदिता सराफ आता ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. झी मराठीने मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित करताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
nivedita saraf lead role in krushnaichya leki

nivedita saraf lead role in krushnaichya leki : छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची रेलचेल सुरू असताना आता ‘झी मराठी’ आणखी एका कौटुंबिक मालिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वी चॅनेलकडून ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. मात्र या मालिकेत मुख्य भूमिका कोण साकारणार याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. अखेर मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला असून लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा दमदार लूक पाहून चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

‘अग्गंबाई सासूबाई’ आणि ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या निवेदिता सराफ यांनी साकारलेली ‘बबड्याची आई’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांच्या सहज अभिनयामुळे हे पात्र प्रचंड गाजलं होतं. जवळपास पाच वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याने मालिकेबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.

‘कृष्णाईच्या लेकी’च्या प्रोमोमध्ये एका खंबीर आईची संघर्षमय कहाणी दाखवण्यात आली आहे. परिस्थितीशी दोन हात करत आपल्या मुलींना सक्षम बनवण्याचा निर्धार केलेली स्त्री अशी या भूमिकेची झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळते. “माझ्या लेकींची आईही मीच आणि बापही मीच,” हा संवाद सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे. मुलींना शिक्षण देऊन स्वाभिमानाने जगायला शिकवणारी आई ही संकल्पना प्रेक्षकांना भावताना दिसत आहे.

मालिकेच्या कथानकात स्त्रीशक्ती, मातृत्व आणि समाजातील पारंपरिक विचारसरणीवर भाष्य करण्यात आलं आहे. मुलगा नसल्यामुळे स्त्रीला कमी लेखण्याची मानसिकता आणि त्यातून उभा राहणारा संघर्ष याचं वास्तववादी चित्रण मालिकेत पाहायला मिळणार असल्याचं प्रोमोवरून स्पष्ट होतं. त्यामुळे ही मालिका केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता सामाजिक संदेश देणारी ठरेल, अशी चर्चा सुरू झाली आहे

दरम्यान, ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका हिंदीतील ‘गंगा माई की बेटियां’ आणि मूळ तेलुगू मालिका ‘राधाम्मा कुथुरु’वर आधारित असल्याचं समोर आलं आहे. दक्षिणेतील या लोकप्रिय कथेला मराठी प्रेक्षक कितपत पसंती देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मराठी प्रेक्षकांच्या आवडीनुसार कथेत काही बदल करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

हे पण वाचा.. त्याच्या मनात जे असतं ते तो लगेच बोलतो, पूर्वा कौशिकने सांगितली प्रसाद जवादेची खास सवय

nivedita saraf lead role in krushnaichya leki

मालिकेची वेळ आणि प्रसारणाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी प्रोमोमुळे मालिकेभोवतीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर चाहत्यांकडून निवेदिता सराफ यांच्या पुनरागमनाचं जोरदार स्वागत केलं जात आहे. अनेकांनी “पुन्हा एकदा झी मराठीवर खरी अभिनेत्री परतली” अशा प्रतिक्रिया देत उत्साह व्यक्त केला आहे.

हे पण वाचा.. संध्याकाळी ७ नंतर जेवत नाही ; ‘शुभश्रावणी’ फेम वल्लरी विराजचा फिटनेस मंत्र चर्चेत, नाश्त्यात खाते घरगुती पदार्थ

आता या मालिकेत निवेदिता सराफ यांच्यासोबत आणखी कोणते कलाकार झळकणार, तसेच चॅनेल ही मालिका कोणत्या वेळेत प्रसारित करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. नव्या मालिकेसाठी कोणत्या जुन्या मालिकेचा स्लॉट बदलणार किंवा कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत.