ADVERTISEMENT

देवमाणूस-मधला अध्याय’मध्ये होणार मोठा ट्विस्ट? गोपाळच्या आयुष्यात ‘ती’ची एंट्री; प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये चर्चा

devmanus madhla adhyay new twist mystery girl entry dimple back : ‘देवमाणूस-मधला अध्याय’ मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. मंदिरात अचानक एका रहस्यमय तरुणीची एंट्री होताच गोपाळ हादरल्याचे दिसत आहे. ही मुलगी डिंपलच आहे का? सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
devmanus madhla adhyay new twist mystery girl entry dimple back

devmanus madhla adhyay new twist mystery girl entry dimple back : ‘देवमाणूस-मधला अध्याय’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत असून प्रत्येक भागात नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. मालिकेतील गोपाळ आणि लाली यांच्यातील संघर्षानंतर आता कथानक एका वेगळ्याच वळणावर येताना दिसत आहे. नुकताच समोर आलेल्या नव्या प्रोमोमुळे सोशल मीडियावर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असून, मालिकेत पुन्हा एका जुन्या पात्राची एंट्री होणार का याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

गेल्या काही भागांमध्ये लाली आणि गोपाळ यांच्यात पैशांवरून मोठा वाद झालेला दाखवण्यात आला होता. माधुरी आणि आर्या यांच्याकडील पैसे लालीने लपवून ठेवल्यामुळे गोपाळ संतापला होता. त्यानंतर त्याने लालीला जबरदस्तीने बंदिस्त करून तिच्यावर अत्याचार केल्याचेही कथेत दाखवण्यात आले. मात्र, योग्य संधी साधून लाली त्याच्या तावडीतून सुटली आणि गोपाळला अडकवण्यासाठी तिने मोठी योजना आखली.

लालीच्या युक्तीमुळे गोपाळवर तिच्या खुनाचा संशय गेला आणि तो तुरुंगातही पोहोचला. मात्र, कोर्टात शेवटच्या क्षणी लाली अचानक समोर आल्याने सगळेच हादरले. तिने प्रसिद्ध वकील युगंधरने आपले अपहरण केल्याचा आरोप केला. त्याचबरोबर स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याच्यावर वार केल्याचेही तिने सांगितले. या घटनेनंतर गोपाळ आणि लाली पुन्हा एकत्र राहू लागले असले तरी त्यांच्या आयुष्यातील अनेक सत्य अजूनही समोर आलेले नाहीत.

अशातच झी मराठीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोने कथेला आणखी रहस्यमय रंग दिला आहे. या व्हिडिओमध्ये गोपाळ आणि लाली मंदिरात दर्शनासाठी गेलेले दिसतात. दोघेही देवासमोर उभे असताना अचानक एका तरुणीची एंट्री होते. हिरवा आणि गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली ही मुलगी पाठमोरी दिसते. तिचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. मात्र ती मंदिरात येताच गोपाळला काहीतरी वेगळं जाणवतं आणि तो मागे वळून पाहतो. त्याला पाहताच ती तरुणी धावत येऊन त्याला मिठी मारते. या क्षणी गोपाळच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि धक्का स्पष्ट दिसतो, तर लालीही गोंधळलेली दिसते.

या प्रोमोच्या शेवटी दाखवण्यात आलेल्या ओळींनी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. त्यामुळे आता ही नवीन व्यक्ती नेमकी कोण आहे, याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अनेक प्रेक्षकांनी कमेंट करत ही व्यक्ती डिंपलच असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काहींनी “डिंपल परत आली”, “आता मालिकेत खरी मजा येणार”, “टीआरपी पुन्हा वाढणार” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे पण वाचा.. स्वप्नपूर्तीचा खास क्षण ! ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम भूमिजा पाटीलने घेतली नवी कार !

devmanus madhla adhyay new twist mystery girl entry dimple back

‘देवमाणूस’ मालिकेतील डिंपल हे पात्र अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने साकारले होते. डॉक्टर अजितकुमारसोबत मिळून अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या डिंपलची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. त्यामुळे तिच्या पुनरागमनाच्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हे पण वाचा.. ठरलं तर मग मालिकेसाठी दिवसाला १३ ते २४ तासांचे शूटिंग; जुई गडकरीचा खुलासा

आता प्रत्यक्षात ही मुलगी डिंपलच आहे की कथेत आणखी एखादा मोठा ट्विस्ट दडलेला आहे, हे आगामी भागांमध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र, या नव्या प्रोमोमुळे ‘देवमाणूस-मधला अध्याय’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, हे नक्की.