tharal tar mag sayali bhutkal tanvi satya priya garodar twist : ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मराठी मालिकेत सध्या प्रेक्षकांना जबरदस्त ट्विस्ट आणि भावनिक घडामोडी पाहायला मिळत आहेत. प्रत्येक भागागणिक कथानक अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं असून आता मालिकेत एकाचवेळी दोन मोठे धक्के प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सायलीच्या आयुष्यातील भूतकाळ पुन्हा तिच्यासमोर उभा राहत असताना, प्रिया पुन्हा एकदा सुभेदार कुटुंबात गोंधळ निर्माण करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसत आहे.
प्रियाचा खरा चेहरा अखेर सगळ्यांसमोर आला आहे. तिने आजवर केलेल्या फसवणुकीमुळे सुभेदार कुटुंबाला मोठा धक्का बसला. तिच्या कारस्थानांमुळे अनेक नात्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आता प्रिया तुरुंगात असली तरी तिचं संकट अजून संपलेलं नाही. उलट तिच्या आयुष्यात आता नवीन वळण येणार आहे. प्रकृती बिघडल्यामुळे तिला तपासणीसाठी नेलं जातं आणि त्यावेळी तिच्या गरोदरपणाबद्दल संकेत मिळतात. ही गोष्ट समोर आल्यानंतर कथानक आणखी रंजक होणार आहे.
दुसरीकडे सायलीही स्वतःच्या तब्येतीमुळे डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाते. घरी केलेल्या टेस्टमध्ये तिला आई होणार असल्याचं समजतं. मात्र खात्री करण्यासाठी ती वैद्यकीय तपासणी करून घेते. जर सायली आणि प्रिया दोघीही गरोदर असल्याचं स्पष्ट झालं, तर सुभेदार कुटुंबात मोठा भावनिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे प्रिया या परिस्थितीचाही फायदा घेऊन अश्विनला पुन्हा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
मालिकेतील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे सायलीचा भूतकाळ. पूर्णा आजींच्या तब्येतीमुळे सायली सध्या तन्वी असल्याचं नाटक करत आहे. मात्र या सगळ्यात एक वेगळंच सत्य लपलेलं असल्याचे संकेत मालिकेत सातत्याने दिले जात आहेत. सायलीलाच तिच्या जुन्या आठवणी परत येऊ लागल्या आहेत. घराजवळील गार्डनमध्ये फिरत असताना तिला काही धूसर प्रसंग आठवतात. एका छोट्या मुलीने पूर्णा आजींचा चष्मा झाडाखाली लपवल्याचं दृश्य तिच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि ती पूर्णपणे हादरून जाते.
या आठवणी नेमक्या का परत येत आहेत? त्या मुलीचा आणि सायलीचा काय संबंध आहे? पूर्णा आजींविषयीच्या अनेक गोष्टी तिला इतक्या जवळून कशा माहिती आहेत? असे अनेक प्रश्न आता तिच्या मनात निर्माण झाले आहेत. याच धाग्यांमधून सायलीलाच तीच खरी तन्वी असल्याची जाणीव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा.. देवमाणूस-मधला अध्याय’मध्ये होणार मोठा ट्विस्ट? गोपाळच्या आयुष्यात ‘ती’ची एंट्री; प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये चर्चा
tharal tar mag sayali bhutkal tanvi satya priya garodar twist
आगामी भागांमध्ये सायलीचं सत्य उघड होणार का आणि प्रिया पुन्हा एकदा सुभेदार कुटुंबात वादळ निर्माण करणार का, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील हे नवे ट्विस्ट प्रेक्षकांना स्क्रीनसमोर खिळवून ठेवणार एवढं मात्र नक्की.
हे पण वाचा..









