ADVERTISEMENT

३ वर्षांनंतर लोकप्रिय अभिनेत्याचं कमबॅक; पहिल्यांदाच साकारणार क्रूर खलनायक!

anandi serial vikas patil villain role : “स्टार प्रवाहवरील ‘आनंदी’ मालिकेत आता रंगणार नवा संघर्ष. लोकप्रिय अभिनेता विकास पाटील तब्बल तीन वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन करत असून, यावेळी तो पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. ‘विद्याधर निंबाळकर’ या पात्रामुळे मालिकेच्या कथानकाला मोठं वळण मिळणार आहे.”
anandi serial vikas patil villain role

anandi serial vikas patil villain role :  ‘आनंदी’ ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. मालिकेच्या कथानकात येणारे नवनवीन ट्विस्ट आणि भावनिक घडामोडींमुळे प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता या मालिकेत आणखी एक मोठा बदल होणार असून, लोकप्रिय अभिनेता विकास पाटीलच्या एन्ट्रीमुळे कथानकाला वेगळंच वळण मिळणार आहे. विशेष म्हणजे विकास तब्बल तीन वर्षांनंतर पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार असून, यावेळी तो पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारा विकास पाटील नेहमीच सकारात्मक आणि संयमी भूमिकांमुळे ओळखला जातो. मात्र ‘आनंदी’ मालिकेत तो पूर्णपणे वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. मालिकेत तो ‘विद्याधर निंबाळकर’ हे पात्र साकारत असून, या व्यक्तिरेखेची झलक पाहूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

मालिकेतील विद्याधर हा युगंधरचा धाकटा भाऊ आहे. मोठ्या भावाने स्वतःच्या आयुष्यातील संघर्ष सहन करत त्याला शिक्षण दिलं, त्याचं आयुष्य घडवण्यासाठी मेहनत घेतली. पण त्या कष्टांची किंमत न समजणारा विद्याधर आता संपत्ती आणि पैशांच्या मागे आंधळा झालेला दिसणार आहे. उर्मट स्वभाव, अहंकार, ऐषारामाची सवय आणि चुकीच्या मार्गाकडे झुकणारी मानसिकता यामुळे हे पात्र मालिकेत धोकादायक ठरणार आहे. पैशासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी व्यक्तिरेखा विकास साकारत आहे.

हे पण वाचा.. ज्ञानदा रामतीर्थकरच्या होणाऱ्या नवऱ्याला लागली हळद! आईसह हर्षदचा भन्नाट डान्स व्हायरल

या भूमिकेबद्दल बोलताना विकासने सांगितलं की, आजवर त्याने बहुतांश सकारात्मक भूमिका केल्या आहेत. त्यामुळे नकारात्मक व्यक्तिरेखा साकारणं हे त्याच्यासाठी मोठं आव्हान ठरत आहे. विद्याधरच्या रागीट आणि बंडखोर स्वभावामागची मानसिकता समजून घेऊन हे पात्र वास्तववादी पद्धतीने उभं करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्याने म्हटलं आहे. एका अभिनेत्याच्या दृष्टीने स्वतःला वेगळ्या भूमिकेत सिद्ध करण्याची ही उत्तम संधी असल्याची भावना देखील त्याने व्यक्त केली.

दरम्यान, मालिकेत लवकरच आनंदीच्या लग्नाचा ट्रॅक दाखवला जाणार आहे. मात्र हे लग्न होऊ नये यासाठी विद्याधर कोणती खेळी खेळणार, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. विकास पाटीलच्या दमदार एन्ट्रीमुळे मालिकेत नाट्यमय घडामोडी वाढणार असून, आगामी भाग अधिक रंगतदार होणार हे निश्चित मानलं जात आहे.

हे पण वाचा.. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरच्या घरी सुरु झाली लग्नाची लगबग, मेहंदी सोहळ्याचे फोटो चर्चेत

anandi serial vikas patil villain role

‘आनंदी’ ही मालिका दररोज रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जाते.