ADVERTISEMENT

ठरलं तर मग ज्योती चांदेकरांविषयी रोहिणी हट्टंगडी भावना व्यक्त करत म्हणाल्या.. Rohini Hatangadi Tharala Tar Mag

Rohini Hatangadi ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील पूर्णा आजी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. दिवंगत अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी या भूमिकेला वेगळंच आयाम दिलं होतं. त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळे ही व्यक्तिरेखा मालिकेचा आत्मा बनली होती. परंतु काही महिन्यांपूर्वी त्यांच्या निधनानंतर सर्वच चाहत्यांना आणि कलाकारांना मोठा धक्का बसला.

मात्र म्हणतात ना, “शो मस्ट गो ऑन!” त्याप्रमाणे मालिकेच्या टीमने पूर्णा आजींची भूमिका पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि या भूमिकेत आता मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी झळकणार आहेत. नुकतीच त्यांनी मालिकेच्या सेटवर एन्ट्री केली असून त्यांच्या आगमनाने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. Rohini Hatangadi Tharala Tar Mag

‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना रोहिणी हट्टंगडी यांनी या नव्या प्रवासाबद्दल आपले विचार मांडले. त्या म्हणाल्या, “आज माझ्या मनात संमिश्र भावना आहेत. दुसऱ्या कलाकाराने साकारलेल्या भूमिकेत काम करणे ही माझ्यासाठी पहिलीच वेळ आहे. ज्योती माझी चांगली मैत्रीण होती. आम्ही फारसा संपर्कात नसतो, पण जेव्हा भेट व्हायची तेव्हा गप्पा नक्की व्हायच्या. माझ्या बालनाट्य काळात आम्ही ‘सुंदर मी होणार’ या नाटकात एकत्र काम केलं होतं. ती मेनकाची भूमिका करत होती आणि मी बेबी राजे होते.”

त्यांनी पुढे सांगितलं, “ज्योतीचं ‘मित्र’ या चित्रपटातील काम मला फार आवडलं होतं. मी तिला स्वतः सांगितलं होतं की ती भूमिका तिने अप्रतिम केली आहे. आता तिच्याच जागी मी ही व्यक्तिरेखा साकारतेय, ही भावना खूप वेगळी आहे. प्रेक्षकांना ही नवीन रूपातली पूर्णा आजी आवडेल का, याबद्दल थोडी चिंता आहे; पण मला खात्री आहे की मराठी प्रेक्षक नेहमीप्रमाणे उदार मनाने या बदलाचं स्वागत करतील.”

‘ठरलं तर मग’ मालिकेत नवा चेहरा! रोहिणी हटंगडी साकारणार पूर्णा आजीची भूमिका; सेटवरचं स्वागत खास पद्धतीनं

सेटवरच्या पहिल्या दिवसाचा अनुभव सांगताना रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, “मी आल्या आल्या प्राजक्ताने मला मिठी मारली. चार दिवस सासूचं मालिकेत ती माझी सून होती, आणि आता ‘ठरलं तर मग’मध्येही तीच माझी सून आहे. सगळ्यांनी अगदी आपुलकीने स्वागत केलं.” ‘ठरलं तर मग’च्या प्रेक्षकांसाठी ही मोठी बातमी असून, आता रोहिणी हट्टंगडी पूर्णा आजींच्या रूपात मालिकेत नवीन ऊर्जा आणतील, असा विश्वास सर्वांना वाटतो. त्यांच्या येण्याने मालिकेला नवसंजीवनी मिळेल, अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. Rohini Hatangadi

Leave a Comment