ADVERTISEMENT

‘Bigg Boss 19’ मध्ये अमाल मलिकची मर्यादा ओलांडणारी कृती; सलमान खानचा संताप, वीकेंडला दिला कडक इशारा

bigg boss19 salman warns amaal malik :
bigg boss19 salman warns amaal malik

bigg boss19 salman warns amaal malik : ‘बिग बॉस १९’ च्या घरात गेल्या काही दिवसांपासून वादविवादांची मालिकाच सुरु आहे. गुरुवारी दाखवलेल्या भागात घडलेली एक घटना मात्र प्रेक्षकांसाठी आणि घरातील सदस्यांसाठी धक्कादायक ठरली. कॅप्टनपदासाठी चाललेल्या टास्कदरम्यान फरहाना भट्ट हिने नीलमसाठी आलेलं पत्र फाडून टाकलं. त्यावर स्पर्धक अमाल मलिक प्रचंड भडकला आणि त्याने मर्यादा ओलांडणारी कृती केली.

अमालने फरहाना जेवत असताना तिच्यासमोरची थाळी हिसकावून घेतली आणि रागाच्या भरात ती प्लेट फेकून दिली. त्यानंतर त्याने प्लेट फोडली आणि फरहानाच्या आईबद्दल आक्षेपार्ह भाषेत टीका केली. या घटनेनंतर घरात तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं. प्रेक्षकांकडूनही अमालच्या वर्तणुकीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

या संपूर्ण प्रसंगावर वीकेंडच्या भागात होस्ट सलमान खानने कठोर भूमिका घेतली. त्याने अमाल मलिकला थेट सुनावलं आणि मर्यादा न पाळल्याबद्दल कडक इशारा दिला. “जेवण हे देवाने सर्वांना दिलंय. कोणाचंही अन्न हिसकावण्याचा अधिकार तुला कोणी दिला नाही. फरहानाच्या आईबद्दल बोलताना तू जी भाषा वापरलीस ती पूर्णपणे चुकीची आहे,” असे सलमानने अमालला सुनावत म्हटलं. याच वेळी सलमानने स्पष्ट केलं की, “आता तुला शेवटचा इशारा देतोय. पुन्हा असं झालं तर परिणाम गंभीर असतील.”

या घटनेदरम्यान अमालच्या वडिलांनाही घरात बोलावण्यात आलं होतं. त्यांनी मुलाला समजावताना डोळ्यांत अश्रू आणले आणि भावूक होत सांगितलं, “भांडणं चालतात, पण बोलताना मर्यादा राख. तुझ्या वागण्यामुळे आमच्यावर वाईट शिक्का बसू नये.” वडिलांच्या या शब्दांनी अमालही भावूक झाला आणि त्याने फरहाना व तिच्या आईची माफी मागितली. त्याने सांगितलं की, रागाच्या भरात त्याच्याकडून चूक झाली.

दरम्यान, शुक्रवारीच्या भागात अमालने खुल्या मंचावर माफी मागत आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र सलमान खानने ही घटना हलक्यात न घेता त्याला कठोर इशारा दिला आहे. आता पुढच्या भागात अमालचं भवितव्य काय ठरेल आणि घरातील समीकरणं कशी बदलतील याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा.. टेलिव्हिजनमध्ये नखरे चालत नाहीत, काम करावंच लागतं – Smriti Irani स्पष्ट वक्तव्य

‘Bigg Boss 19’ मध्ये ही घटना सध्या चर्चेचा मुख्य विषय ठरत असून सोशल मीडियावरही #BiggBoss19 हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. वीकेंडच्या भागात सलमान खानने घेतलेली ही कडक भूमिका शोच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

हे पण वाचा.. bigg boss 19 ’च्या घरात भावूक क्षण; सगळ्यांना हसवणारा प्रणीत मोरे पहिल्यांदाच रडला!

bigg boss19 salman warns amaal malik