ADVERTISEMENT

स्टार प्रवाहवर नवी मालिका ‘सुना येती घरा’! अशोक शिंदे, दीपा परब आणि शर्मिष्ठा राऊत प्रमुख भूमिकेत

star pravah suna yeti ghara deepa parab sharmishtha raut new serial : ‘स्टार प्रवाह’वर आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ‘सुना येती घरा’ या मालिकेचा पहिला प्रोमो चर्चेत आला आहे. अभिनेत्री दीपा परब छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून शर्मिष्ठा राऊत खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका हिंदीतील लोकप्रिय कथानकावर आधारित असल्याची चर्चा रंगली आहे.
star pravah suna yeti ghara deepa parab sharmishtha raut new serial

star pravah suna yeti ghara deepa parab sharmishtha raut new serial : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने गेल्या काही दिवसांपासून नव्या मालिकांचा सपाटा लावला असून प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. ‘पाठराखीण’ या मालिकेनंतर आता वाहिनीने ‘सुना येती घरा’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची घोषणा केली आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मालिकेबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे. कौटुंबिक नात्यांवर आधारित असलेल्या या मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकार एकत्र झळकणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

या मालिकेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे अभिनेत्री दीपा परबचं छोट्या पडद्यावर होणारं पुनरागमन. सुपरस्टार अंकुश चौधरी यांची पत्नी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपा परब पुन्हा एकदा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी याआधी अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता ‘सुना येती घरा’मधून त्या ‘उमावती’ ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतील. त्यांच्या भूमिकेला मालिकेत विशेष महत्त्व असल्याचं प्रोमोमधून स्पष्ट होत आहे.

याशिवाय अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. त्या ‘पद्मावती’ ही व्यक्तिरेखा साकारणार असून त्यांच्या भूमिकेतून मालिकेत मोठा संघर्ष आणि नाट्य पाहायला मिळणार आहे. उमावती आणि पद्मावती या दोन बहिणी असल्या तरी त्यांच्या आयुष्यातील निर्णयांमुळे दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद निर्माण होतो. उमावती घरच्यांच्या विरोधात जाऊन शिवनाथशी विवाह करते आणि त्यानंतर दोन घरांतील नातेसंबंध ताणले जातात. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा संघर्ष मालिकेच्या कथानकाचा मुख्य भाग असणार आहे.

लोकप्रिय अभिनेते अशोक शिंदे मालिकेत ‘शिवनाथ’ ही भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे ‘स्टार प्रवाह’सोबतची ही त्यांची नववी मालिका ठरणार आहे. अनुभवी कलाकारांसोबतच मालिकेत इतरही अनेक ओळखीचे चेहरे झळकणार असल्याने ही मालिका प्रेक्षकांसाठी खास ठरणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर आणखी एका गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे. अनेक प्रेक्षकांनी ही मालिका हिंदी मालिकेच्या धर्तीवर तयार करण्यात आल्याचा दावा केला आहे. ‘कलर्स टीव्ही’वरील ‘महादेव अँड सन्स’ या मालिकेच्या कथानकाशी ‘सुना येती घरा’चं साधर्म्य असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. त्यामुळे ही मालिका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हे पण वाचा.. २०११ ते २०२६…! विशाखा सुभेदारची पंढरीनाथ कांबळेसाठी खास पोस्ट; “तुझ्यासारखा प्रवास सवंगडी नाहीच…”

star pravah suna yeti ghara deepa parab sharmishtha raut new serial

या मालिकेविषयी बोलताना ‘स्टार प्रवाह’चे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे यांनी मालिकेची संकल्पना प्रेक्षकांना भावेल असा विश्वास व्यक्त केला आहे. कुटुंब, नाती आणि घरात येणाऱ्या तीन सुनांमुळे निर्माण होणारे वेगवेगळे प्रसंग प्रेक्षकांना नक्कीच आवडतील असं त्यांनी सांगितलं. कौटुंबिक भावभावनांवर आधारित ही कथा प्रेक्षकांना भावनिकरित्या जोडून ठेवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हे पण वाचा.. तारिणी मालिकेत मोठा बदल! सिद्धीरुपा करमरकरची एक्झिट; पद्मिनी काकूंच्या भूमिकेत शीतल क्षीरसागरची दमदार एन्ट्री

सध्या तरी मालिकेची अधिकृत प्रसारण तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी ‘सुना येती घरा’चा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. स्टार प्रवाहच्या आगामी मालिकांमध्ये ही मालिका विशेष लक्ष वेधून घेणार असल्याचं चित्र सध्या दिसत आहे.