ADVERTISEMENT

ओवी-अबीरमुळे सारंग आणि सावली पुन्हा समोरासमोर; आता मिटणार का गैरसमज?

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ओवी आणि अबीरच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर सारंग आणि सावली पुन्हा एकमेकांसमोर येणार असून त्यांच्या आयुष्यातील जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होणार आहेत.
ovi abir mule sarang savli punha samor samor savalyachi janu savali twist

ovi abir mule sarang savli punha samor samor savalyachi janu savali twist : ‘सावळ्याची जणू सावली’ या लोकप्रिय मालिकेत सध्या प्रेक्षकांना भावनिक आणि उत्कंठावर्धक घडामोडी पाहायला मिळत आहेत. मालिकेतील सारंग आणि सावली यांची कथा सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अनेक संकटांचा सामना करत सावलीने मेहेंदळे कुटुंबात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. तिचा स्वभाव, तिचं गाण्याचं कौशल्य आणि प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभं राहण्याची ताकद यामुळे ती प्रेक्षकांची आवडती व्यक्तिरेखा बनली.

सारंग हा श्रीमंत घरातील मुलगा असला तरी सावलीच्या साधेपणाने आणि प्रेमळ स्वभावाने तो तिच्या जवळ आला. दोघांमध्ये आधी मैत्री निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांच्या नात्याला प्रेमाची किनार मिळाली. मात्र, त्यांच्या सुखी संसारात भैरवी, राजकुमार आणि तिलोत्तमा यांनी अनेक अडथळे निर्माण केले. गैरसमज, कटकारस्थान आणि परिस्थितीमुळे सारंग आणि सावली एकमेकांपासून दूर गेले.

यानंतर मालिकेत मोठं वळण आलं. सावलीला जुळी मुलं झाली, पण त्या गोष्टीची माहिती सारंगपर्यंत पोहोचली नाही. दुसरीकडे, राजकुमारने सावली आणि तिच्या मुलांच्या जीवावर उठत गुंड पाठवले. या धक्कादायक प्रसंगात सावली एका बाळाला वाचवू शकली, तर दुसरं बाळ गुंडांच्या तावडीत सापडलं. त्याच वेळी सारंग त्या बाळाच्या मदतीला धावून आला. त्याने गुंडांशी झुंज देत त्या चिमुकलीचा जीव वाचवला आणि तिला स्वतःच्या मुलीसारखं वाढवू लागला. मात्र, ती मुलगी म्हणजेच ओवी ही त्याचीच लेक आहे, याची त्याला अजूनही कल्पना नाही.

दरम्यान, सावली अबीरसोबत वेगळं आयुष्य जगत आहे. ओवी गाणं शिकण्यासाठी सावलीकडे येऊ लागते, तर अबीर आणि सारंग यांच्यातही एक वेगळं नातं निर्माण झालेलं दिसत आहे. या सर्व घडामोडींमुळे आता कथा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे.

समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये ओवी आणि अबीरमुळे सारंग आणि सावली पुन्हा समोरासमोर येणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. एका कार्यक्रमात सावली आणि ओवी स्टेजवर गाणं सादर करत असताना सारंग आणि अबीर तिथे पोहोचतात. अबीर मोठ्याने सावलीला “आई” अशी हाक मारतो, तर ओवी सारंगला “बाबा” म्हणते. त्या क्षणी सारंग आणि सावली एकमेकांकडे पाहतात आणि त्यांच्या भूतकाळातील अनेक आठवणी पुन्हा जाग्या होतात.

दोघेही जुन्या जखमा आणि गैरसमज आठवून वेगळ्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ओवी आणि अबीर त्यांना थांबवतात. त्यामुळे आता त्यांच्या नात्यातील दुरावा कमी होणार का? सत्य समोर आल्यानंतर सारंगला ओवीबद्दलची खरी गोष्ट समजणार का? तसेच अनेक वर्षांपासून निर्माण झालेले गैरसमज दूर होऊन हे कुटुंब पुन्हा एकत्र येणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा .. शॉर्ट बॉडीकॉन लूकमध्ये, हातात दारूची बाटली घेऊन ‘निलांबरी’ची एन्ट्री!

ovi abir mule sarang savli punha samor samor savalyachi janu savali twist

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील हा भावनिक ट्विस्ट प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये मोठा धक्का देणार असल्याचं चित्र दिसत आहे.

हे पण वाचा.. लपंडाव मालिकेत “कालिंदी”ची धमाकेदार एन्ट्री; सखी-कान्हाच्या आयुष्यात नवे वादळ!