ADVERTISEMENT

ज्ञानदा रामतीर्थकरचं खास केळवण; सहकलाकारांनी केला सरप्राईज सेलिब्रेशन

dnyanada ramtirthkar kelvan photos : मराठी मालिकांमधून लोकप्रिय ठरलेली "ज्ञानदा रामतीर्थकर" लवकरच विवाहबंधनात अडकणार असून तिचं पहिलं केळवण सहकलाकारांनी मोठ्या आनंदात साजरं केलं. या खास क्षणांचे फोटो सध्या चर्चेत आहेत.
dnyanada ramtirthkar kelvan photos.

dnyanada ramtirthkar kelvan photos : मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. अनेक कलाकारांनी अलीकडेच त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता लोकप्रिय अभिनेत्री “ज्ञानदा रामतीर्थकर” हिचं नावही चर्चेत आलं आहे. छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी ज्ञानदा लवकरच विवाहबंधनात अडकणार असून तिच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

“ठिपक्यांची रांगोळी” आणि “लग्नानंतर होईलच प्रेम” या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली ज्ञानदा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील या खास टप्प्याचा आनंद घेताना दिसत आहे. नुकतंच तिचं पहिलं केळवण पार पडले असून या सोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे तिच्या या केळवणाचा कार्यक्रम “ठिपक्यांची रांगोळी” मालिकेतील सहकलाकारांनी आयोजित केला होता.

या कार्यक्रमात ज्ञानदा आणि तिचा होणारा नवरा “हर्षद आत्माराम” दोघेही खूप आनंदी दिसत होते. हर्षद हा व्यावसायिक सिनेमॅटोग्राफर असून दोघांची प्रेमकहाणीही खूप खास आहे. त्यांच्या नात्याची सुरुवात २०१५ मध्ये एका शॉर्ट फिल्मच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्या वेळी झालेली ओळख हळूहळू मैत्रीत बदलली आणि नंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. काही वर्षांच्या नात्यानंतर २०१९ मध्ये हर्षदने ज्ञानदाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं.

अलीकडेच फेब्रुवारी महिन्यात या दोघांचा साखरपुडा पार पडला आणि आता लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. केळवणाच्या या सोहळ्यात सहकलाकारांनी खास सजावट, स्वादिष्ट जेवण आणि आनंदी वातावरण तयार केलं होतं. या क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून चाहत्यांकडून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

हे पण वाचा.. २६ वर्षांनंतर हर्षदा खानविलकर यांची रंगभूमीवर परतण्याची इच्छा

dnyanada ramtirthkar kelvan photos

ज्ञानदाच्या या नव्या प्रवासासाठी तिचे चाहते आणि सहकलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहून तिच्या आयुष्यातील हा टप्पा किती खास आहे, हे स्पष्टपणे जाणवतं. आता तिच्या लग्नसोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

हे पण वाचा.. ‘कमळी’ फेम “विजया बाबर”चीओडिशातील ऐतिहासिक कोणार्क सूर्यमंदिराला खास भेट