ADVERTISEMENT

आय लव्ह यू स्वानंदी मॅडम! अखेर समरने व्यक्त केल्या मनातील भावना; ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या विशेष भागाची उत्सुकता शिगेला

veen doghantali hi tutena samar swanandi prem prapose vishesh bhag : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत अखेर समर आपल्या पत्नी स्वानंदीसमोर प्रेमाची कबुली देणार आहे. दोन तासांच्या विशेष भागात प्रेक्षकांना भावनिक, रोमँटिक आणि संस्मरणीय क्षणांचा अनुभव मिळणार असून समर-स्वानंदीच्या नात्यातील नव्या पर्वाची सुरुवात पाहायला मिळणार आहे.
veen doghantali hi tutena samar swanandi prem prapose vishesh bhag

veen doghantali hi tutena samar swanandi prem prapose vishesh bhag : मराठी मालिकांमध्ये सध्या अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळत आहेत. त्यात ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली असून आता या मालिकेत एक मोठा आणि भावनिक टप्पा येणार आहे. अनेक गैरसमज, संघर्ष आणि नात्यातील चढ-उतार अनुभवल्यानंतर अखेर समर आपल्या पत्नी स्वानंदीसमोर प्रेमाची कबुली देणार आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी दोन तासांच्या विशेष भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

गेल्या काही भागांमध्ये समर आणि स्वानंदी यांच्यातील नातं हळूहळू अधिक मजबूत होताना दिसत आहे. सुरुवातीला स्वानंदीबद्दल चुकीचा समज करून घेतलेल्या समरला आता तिच्या स्वभावाची आणि तिच्या प्रामाणिकपणाची खरी ओळख पटली आहे. प्रत्येक कठीण प्रसंगात सत्याची साथ देणारी, कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करणारी आणि प्रत्येक व्यक्तीला समजून घेणारी स्वानंदी समरच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.

अलीकडील घडामोडींमध्ये अंशुमनचे खरे रूप समोर आले, तर सुश्मिताच्या वागण्यामागील वास्तवही उघड झाले. या सर्व प्रसंगांमध्ये स्वानंदीने संयम, समजूतदारपणा आणि कुटुंबावरील प्रेम जपले. याच काळात समरने तिची प्रत्येक कृती जवळून अनुभवली. इतकेच नव्हे, तर स्वानंदीचा अपमान होताच समरने स्वतःच्या बहिणीलाही स्पष्ट शब्दांत सुनावले आणि पत्नीच्या सन्मानासाठी ठाम भूमिका घेतली. या निर्णयामुळे त्याच्या मनातील बदल अधिक स्पष्ट झाला.

आता समर आपल्या भावना शब्दांत व्यक्त करण्याचा निर्णय घेतो. त्यासाठी त्याला आनंद आणि निकिता मदत करतात. स्वानंदीला निसर्ग, फुले आणि हिरवाईची आवड असल्याचे लक्षात घेऊन समर खास रोमँटिक वातावरण तयार करतो. विविध फुलांची आणि छोट्या रोपट्यांची आकर्षक सजावट करून तो प्रेमाचा अविस्मरणीय क्षण घडवून आणतो. त्या सुंदर वातावरणात पुष्पगुच्छ हातात घेत समर स्वानंदीसमोर आपल्या भावना व्यक्त करतो.

“तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहात. तुम्हीच माझा श्वास आहात. सौभाग्यवती स्वानंदी समर राजवाडे… माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. आय लव्ह यू!” अशा शब्दांत समर आपल्या प्रेमाची कबुली देतो. समरने केलेल्या या खास तयारीने स्वानंदी भारावून जाते. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळतात आणि दोघांच्या नात्याला नव्या सुरुवातीची सुंदर चाहूल मिळते.

हे पण वाचा.. १४०० हून अधिक भागांचा यशस्वी प्रवास संपणार! ‘मुरांबा’ मालिकेचा २८ जूनला होणार भावनिक निरोप

veen doghantali hi tutena samar swanandi prem prapose vishesh bhag

या रोमँटिक वळणामुळे मालिकेच्या कथानकात नवी रंगत येणार आहे. प्रेक्षक अनेक दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होते आणि अखेर त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. समर आणि स्वानंदी यांच्या प्रेमकथेचा हा महत्त्वाचा टप्पा दोन तासांच्या विशेष भागातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे पण वाचा.. तारिणीमध्ये अखेर प्रेमाची कबुली! केदारच्या भन्नाट प्रपोजलने भारावली तारिणी, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

‘वीण दोघांतली ही तुटेना’चा विशेष भाग २८ जून रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत प्रसारित केला जाणार आहे. समर आणि स्वानंदीच्या नात्यातील हा संस्मरणीय क्षण पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावरही त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.