tharala tar mag arjun mahipat nagraj court : लोकप्रिय मालिका Tharala Tar Mag सध्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आणि सायली नागराजविरोधात ठोस पुरावे गोळा करण्यासाठी धडपड करत असल्याचं चित्र प्रेक्षकांनी पाहिलं. तब्बल २२ वर्षांपूर्वी घडलेल्या रविराज आणि प्रतिमाच्या अपघातामागे नागराजचा हात असल्याचा संशय आधीपासूनच होता; मात्र पुराव्याअभावी तो कायद्याच्या कचाट्यात सापडत नव्हता. अखेर या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू झाली आणि सगळ्यांच्या नजरा मुख्य साक्षीदार महिपतकडे लागल्या.
महिपत जर नागराजविरोधात उभा राहिला तर संपूर्ण केसचं पारडं फिरू शकतं, हे सगळ्यांना ठाऊक होतं. मात्र महिपतला सत्य बोलायला लावणं सोपं नव्हतं. अशातच अर्जुनला साक्षी शिखरे जिवंत असल्याचा धागा लागतो. या संशयाच्या जोरावर त्याने कोर्टात एक धाडसी खेळी केली. त्याच्याकडे साक्षीचे कोणतेही ठोस फोटो नसतानाही “साक्षी जिवंत आहे आणि तिचे पुरावे माझ्याकडे आहेत,” असा इशारा देत त्याने महिपतला थेट ब्लॅकमेल केलं.
नागराजचे वकील सतत आक्षेप घेत असतानाही अर्जुनने आपली रणनीती कायम ठेवली. लेकीसाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या महिपतचा कमकुवत बिंदू ओळखून अर्जुनने शेवटचा डाव टाकला आणि तो अचूक बसला. कोर्टात वातावरण तंग असताना महिपत अखेर कोसळला. त्याने केलेल्या सर्व गुन्ह्यांची कबुली देत नागराजनेच या सगळ्या कटाची सुपारी दिल्याचं स्पष्ट केलं. या कबुलीनंतर न्यायालयाने महिपत आणि नागराज दोघांनाही आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.
केस जिंकल्यानंतर अर्जुनचं सर्वत्र कौतुक होत असलं तरी नाट्यमय घडामोडी इथेच थांबत नाहीत. तुरुंगात जाताना नागराजने प्रियाला जीवे मारण्याची धमकी दिली. इतकंच नव्हे, तर अर्जुन-सायलीला उद्देशून “तुमच्या कुटुंबासमोर अजून मोठं सत्य दडलेलं आहे,” असा इशाराही त्याने दिला. या विधानामुळे नव्या रहस्याची दारं उघडली गेली आहेत.
हे पण वाचा.. वीण दोघांतली ही तुटेना मालिकेमध्ये स्वानंदी अंशुमनला ठणकावून प्रतिउत्तर देणार..
आता खरी तन्वी कोण, अस्मिताचा नवरा आणि साक्षी शिखरे यांच्यातील नातं काय, आणि सचिनबद्दलचं सत्य अर्जुन-सायलीसमोर कधी येणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. Tharala Tar Mag मधील हा कोर्टरूम ट्रॅक संपला असला तरी पुढील भागांमध्ये आणखी मोठं वादळ येण्याची चाहूल या घडामोडींनी दिली आहे. त्यामुळे आगामी भाग अधिकच रोमहर्षक ठरणार, यात शंका नाही.
हे पण वाचा.. अमराठी कलाकारांना पुढच्या रांगेत मान, मराठी दिग्गजांना मागे स्थान? सई ताम्हणकरचा संताप









