पडद्यामागची घट्ट मैत्री! ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या सेटवर निर्माते हेमंत सोनावणे यांचं खास केळवण साजरं
veen doghantali hi tutena hemant sonawane kelvan ceremony : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या सेटवर नुकताच आनंदाचा माहोल पाहायला मिळाला. मालिकेचे निर्माते हेमंत सोनावणे यांच्या आगामी विवाहानिमित्त संपूर्ण टीमने एकत्र येत खास केळवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेजश्री प्रधान, सुबोध भावे यांच्यासह मालिकेतील सर्व कलाकारांनी या सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.