swanandi sardesai marriage traditional look vikrant ramdas : लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि यूट्यूबर “स्वानंदी सरदेसाई” हिच्या आयुष्यातील एक खास क्षण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कोकणातील निसर्ग, संस्कृती आणि दैनंदिन जीवनाचे सुंदर चित्रण करणाऱ्या तिच्या व्हिडीओंमुळे ती अनेकांच्या मनात घर करून आहे. अशातच तिने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी देत लग्न केल्याची घोषणा केली आहे.
“स्वानंदी सरदेसाई” हिने १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विक्रांत रामदास यांच्यासोबत विवाहबंधनात अडकत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. या खास क्षणाची झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली असून, तिच्या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लग्नाच्या फोटोंमध्ये “स्वानंदी सरदेसाई” पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत अत्यंत सुंदर दिसत आहे. तिने हिरव्या रंगाची साधी पण आकर्षक नऊवारी साडी नेसली असून त्यावर सोनेरी बॉर्डर तिच्या लूकला अधिक उठाव देत आहे. सोबतच सोनेरी ब्लाऊज, हिरवा चुडा, नथ, चिचंपेटी, तनमणी आणि झुमके या पारंपरिक दागिन्यांनी तिचं रूप अधिक खुलून आलं आहे. कपाळावर लावलेली चंद्रकोर तिच्या लूकला पूर्णत्व देताना दिसते.
दुसरीकडे तिचे पती विक्रांत रामदास यांनीही पारंपरिक वेश परिधान करत लग्न सोहळ्याला मराठमोळा रंग दिला. पांढऱ्या रंगाचं धोतर, सदरा आणि शेला यामध्ये तेही देखणे दिसत होते. दोघांनीही साधेपणाला प्राधान्य देत पारंपरिक पद्धतीने लग्न उरकल्याचं स्पष्टपणे जाणवतं.
या लग्नसोहळ्याची खास बाब म्हणजे त्यातील साधेपणा आणि सांस्कृतिक जपणूक. आजच्या आधुनिक ट्रेंडमध्येही “स्वानंदी सरदेसाई” आणि विक्रांत यांनी पारंपरिक पद्धतीचा स्वीकार करत एक वेगळी छाप पाडली आहे.
हे पण वाचा.. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर शिवाली परबने कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे घेतले दर्शन
swanandi sardesai marriage traditional look vikrant ramdas
गायिका म्हणूनही “स्वानंदी सरदेसाई” हिने आपली ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘दशावतार’ या चित्रपटासाठी तिने गायलेलं गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या स्वानंदीच्या या नव्या आयुष्यप्रवासासाठी तिचे चाहते तिला भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत.
हे पण वाचा.. नंदिता पाटकरने ४४ व्या वर्षी केला दुसरा विवाह; त्रियुगीनारायण मंदिरात घेतले सात फेरे









