ADVERTISEMENT

स्टार प्रवाहवर सुरू होणार ‘काजळमाया’ हॉरर थ्रिलर मालिका Star Pravah Kajalmaya New Serial

Kajalmaya New Serial 'स्टार प्रवाह'वर 'काजळमाया' ही नवी हॉरर थ्रिलर मालिका प्रेक्षकांसाठी लवकरच सुरू होणार आहे. अक्षय केळकर या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार असून, पहिलाच प्रोमो पाहून नेटकरी उत्साहाने भरले आहेत.
Star Pravah Kajalmaya New Serial

Kajalmaya New Serial : मराठी टेलिव्हिजनवर नेहमी कौटुंबिक नाट्य, मेलोड्रामा किंवा कटकारस्थानं पाहायला मिळतात. पण यावेळी स्टार प्रवाह प्रेक्षकांसाठी काहीतरी हटके घेऊन सज्ज झाला आहे. वाहिनीवर लवकरच ‘काजळमाया’ ही नवी हॉरर थ्रिलर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की, रात्रीच्या अंधारात एक तरुण मोबाईल पाहत जिने चढत असतो. अचानक त्याच्या मागून पैंजणांचा आवाज येतो. तो थबकतो, मागे पाहतो, पण कोणीच दिसत नाही. पुढे चालत जात असतानाच अंधारात एका महिलेची सावली दिसते. ती कोण? तिचा ३०० वर्षांपूर्वीचा भूतकाळ काय? आणि आता तिचं परतणं कोणत्या घटनांना जन्म देणार? हे सगळं रहस्य उलगडणार आहे *’काजळमाया’*मध्ये. Kajalmaya New Serial

या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता राहिला आहे. त्यानंतर त्याने ‘कलर्स मराठी’वरील मालिकेत काम करून प्रेक्षकांचे मन जिंकले. आता तो *’काजळमाया’*च्या माध्यमातून एका वेगळ्या भूमिकेतून मनोरंजन करणार आहे.

प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अनेक वर्षांनी काहीतरी खास पाहायला मिळेल असं वाटतंय”, “सासू-सुनेच्या भांडणांपेक्षा हे काहीतरी वेगळं पाहायला आवडेल”, “आता खरी मजा येणार”, “खतरनाक प्रोमो आहे”, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसल्या.

मराठी इंडस्ट्रीतील ग्रुपिझमबद्दल चेतन वडनेरेचं स्पष्ट मत; म्हणाले, “ओळखीतलेच चार-पाच जण घेतले जातात”

विशेष म्हणजे, मालिकेचा पहिलाच प्रोमो इतका प्रभावी ठरला आहे की, अनेक प्रेक्षकांना ही मालिका नेमकी कशा पद्धतीने पुढे सरकणार आहे याची उत्कंठा लागली आहे. ३०० वर्षांच्या गूढ कथानकासोबत रोमांचक दृश्यांची जोड देत ‘काजळमाया’ लवकरच प्रेक्षकांना नवा अनुभव देणार हे निश्चित आहे.

मराठी मालिकांमध्ये प्रामुख्याने कौटुंबिक आणि भावनिक कथानकांना प्राधान्य दिलं जातं. मात्र या वेळेस ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने हॉरर थ्रिलर या नव्या प्रयोगाला वाव दिला आहे. यामुळे मराठी मालिकांच्या विश्वात एक नवा अध्याय सुरू होणार असल्याचं म्हटलं जातंय. Kajalmaya New Serial

आता प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न घुमतोय – “काजळमायामधील या ३०० वर्षांच्या सावलीचा रहस्यभेद कधी आणि कसा होणार?”