लोकप्रिय अभिनेत्री व कवयित्री Spruha Joshi हिने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने, भावपूर्ण कवितांनी आणि मनमोहक व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करणारी स्पृहा आता ‘मावशी’ झाली आहे. तिच्या धाकट्या बहिणी, क्षिप्रा जोशीला मुलगा झाल्याची खुशखबर तिने सोशल मीडियावर दिली.
स्पृहाने बहिणीच्या वाढदिवशी केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये एक नवा उत्साह पाहायला मिळाला. तिने आपल्या भाच्याचं नाव “कबीर” असल्याचं उघड केलं. भावनिक संदेश लिहिताना ती म्हणते, “यावर्षी तुझा वाढदिवस जरा स्पेशल आहे, कारण कबीर नावाचं सुंदर रिटर्न गिफ्ट तू आम्हाला आधीच दिलं आहेस. त्यासाठी खूप खूप थँक्यू… आय लव्ह यू द मोस्ट.” या खास पोस्टसोबत तिने बहिणीबद्दलचं प्रेम आणि कुटुंबातील आनंद शेअर केला.
अभिनेत्री गौतमी देशपांडेसह अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कौतुकाचे व शुभेच्छांचे कमेंट्स केले. काहींनी छोट्या कबीरसाठी प्रेम व्यक्त केलं, तर काहींनी क्षिप्रालादेखील शुभेच्छांचा वर्षाव केला.
क्षिप्रा जोशीबद्दल बोलायचं झालं तर ती फक्त स्पृहाची बहीण नाही, तर एक यशस्वी क्रीडापटू आहे. २०१० मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने भारतीय रिदमिक जिम्नॅस्टिक्स संघाचं नेतृत्व केलं होतं. जवळपास २० आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना क्षिप्राने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही आपल्या नावावर केला आहे. शिवछत्रपती पुरस्कारानेही तिला गौरवण्यात आलं आहे.
अतुल गोगावले यांच्या पत्नी पूनम दिसतात अभिनेत्रीइतक्याच सुंदर; जाणून घ्या त्यांचा खास प्रवास
दरम्यान, स्पृहाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये संपूर्ण कुटुंब आनंद साजरा करताना दिसत आहे. अभिनयाबरोबरच काव्यलेखनातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली Spruha Joshi सध्या ‘पुरुष’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील ही गोड आनंदवार्ता ऐकून चाहत्यांमध्ये आनंदाचा माहोल निर्माण झाला आहे.









