shiv thackeray goa trip with grandmother funny beach video viral : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय चेहरा असलेला “शिव ठाकरे” पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण कोणताही रिएलिटी शो किंवा नवीन प्रोजेक्ट नसून त्याचा कुटुंबासोबतचा खास क्षण आहे. “शिव ठाकरे”ने नुकतीच त्याच्या आजीसाठी एक खास सरप्राइज ट्रिप प्लॅन केली होती. तो संपूर्ण कुटुंबासह गोव्यात फिरायला गेला असून या ट्रिपमधील मजेशीर क्षणांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नेहमीच कुटुंबाशी घट्ट नातं जपणारा “शिव ठाकरे” अनेकदा त्याच्या आई आणि आजीसोबतचे भावनिक तसेच मजेशीर व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. यावेळीही त्याने आजीला खास सरप्राइज देत गोव्याला नेलं. या प्रवासाचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आणि काही क्षणांतच तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
व्हिडीओमध्ये सुरुवातीला विमानातील एक गोड प्रसंग पाहायला मिळतो. शिवची आजी सीट बेल्ट लावताना थोडी गोंधळलेली दिसते आणि बेल्टची गाठ बांधण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर एअरहोस्टेस येऊन त्यांना मदत करताना दिसते. हा साधा पण निरागस क्षण पाहून चाहत्यांनाही हसू आवरत नाही.
यानंतर शिव कुटुंबासोबत गोव्याच्या बीचवर एन्जॉय करताना दिसतो. समुद्रकिनाऱ्यावर फिरताना तिथल्या वातावरणाचा आनंद घेत असतानाच एक मजेशीर प्रसंग घडतो. बीचवर बिकिनी परिधान केलेल्या फॉरेनर महिलांना पाहिल्यानंतर शिवची आजी आणि आई दोघीही हसताना दिसतात. विशेष म्हणजे आजीची रिअॅक्शन पाहून स्वतः शिवलाही हसू आवरत नाही. त्याने हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला आहे. पुढे व्हिडीओमध्ये शिवची आजी त्या फॉरेनर महिलेसोबत फोटो काढतानाही दिसते. आजीचा हा दिलखुलास अंदाज सोशल मीडियावर नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.
या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी “शिव ठाकरे”च्या साधेपणाचं आणि कुटुंबावर असलेल्या प्रेमाचं कौतुक केलं आहे. काहींनी आजीच्या निरागस रिअॅक्शनला ‘व्हिडीओमधील सर्वात क्यूट मोमेंट’ असंही म्हटलं आहे.
हे पण वाचा.. हास्यजत्रा पाहून अंथरुणातून उठला अर्धांगवायूग्रस्त चाहता – ओंकार राऊतचा भावुक अनुभव
shiv thackeray goa trip with grandmother funny beach video viral
दरम्यान, “शिव ठाकरे”ने रिएलिटी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘रोडीज’मधून त्याला पहिली मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर “बिग बॉस मराठी २”चा विजेता ठरल्यानंतर त्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. पुढे त्याने हिंदी ‘बिग बॉस’मध्येही सहभाग घेत प्रेक्षकांची मनं जिंकली. अलीकडेच पार पडलेल्या ‘द ५०’ या शोचं विजेतेपदही त्याने पटकावलं. आज सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या “शिव ठाकरे”चा हा कौटुंबिक आणि मजेशीर अंदाज चाहत्यांना पुन्हा एकदा भावला आहे.
हे पण वाचा.. घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटेचा भयावह अवतार ! ‘रंगी’च्या धडकी भरवणाऱ्या लूकने वाढवली उत्सुकता









