ADVERTISEMENT

हास्यजत्रा पाहून अंथरुणातून उठला अर्धांगवायूग्रस्त चाहता – ओंकार राऊतचा भावुक अनुभव

hasyajatra pahun paralysis patient bara zala onkar raut kissa : "हसण्यामुळे खरंच आयुष्य बदलू शकतं का?" हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण ओंकार राऊतने सांगितलेला एका चाहत्याचा अनुभव मन हेलावून टाकणारा आहे.
hasyajatra pahun paralysis patient bara zala onkar raut kissa

hasyajatra pahun paralysis patient bara zala onkar raut kissa : मराठी मनोरंजनविश्वात लोकप्रिय ठरलेला अभिनेता Onkar Raut याने अलीकडेच सांगितलेला एक अनुभव सध्या प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जात आहे. विशेषतः महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेल्या ओंकारने एका चाहत्याबद्दल सांगितलेली गोष्ट अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी आहे.

एका मुलाखतीत बोलताना ओंकारने सांगितले की, तो एकदा घराजवळील दुकानात गेला असताना अचानक एका व्यक्तीने त्याला थांबवले. त्या व्यक्तीचे वय साधारण पन्नासच्या आसपास होते. त्याने अचानक ओंकारचे पाय धरले आणि तो पूर्णपणे भावुक झाला. सुरुवातीला ओंकारला काहीच समजले नाही, पण त्या चाहत्याने सांगितलेली गोष्ट ऐकून तो थक्क झाला.

त्या व्यक्तीने सांगितले की, काही काळापूर्वी त्याला अर्धांगवायू झाला होता आणि त्याचा उजवा भाग पूर्णपणे निकामी झाला होता. तो बराच काळ अंथरुणाला खिळलेला होता आणि डॉक्टरांनीही फारशी आशा दिली नव्हती. अशा कठीण काळात त्याच्यासाठी एकमेव आधार ठरला तो म्हणजे हास्यजत्रा हा कार्यक्रम

दररोज तो महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहायचा. त्यातील विनोदी स्किट्स, कलाकारांचा अभिनय आणि हसवणूक त्याला मानसिक आधार देत होती. त्याच्या म्हणण्यानुसार, एका स्किटदरम्यान तो इतका हसला की त्याच्या शरीरात अचानक हालचाल जाणवू लागली आणि हळूहळू तो उठून बसला. हा अनुभव त्याच्यासाठी चमत्कारासारखा होता.

ही गोष्ट सांगताना तो चाहता पूर्णपणे भावुक झाला होता आणि ओंकारही त्या क्षणी गोंधळून गेला होता. हसण्यामुळे इतका मोठा बदल होऊ शकतो, हे ऐकून त्यालाही आश्चर्य वाटले.

हे पण वाचा.. घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटेचा भयावह अवतार ! ‘रंगी’च्या धडकी भरवणाऱ्या लूकने वाढवली उत्सुकता

hasyajatra pahun paralysis patient bara zala onkar raut kissa

याशिवाय ओंकारने आणखी एक प्रसंग सांगितला. एका चाहत्याने घटस्फोटानंतर नैराश्यात जाऊन आयुष्य संपवण्याचा विचार केला होता. मात्र हास्यजत्रा पाहिल्यानंतर त्याने आपला विचार बदलला आणि आयुष्याकडे पुन्हा सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात केली.

हे पण वाचा.. कमळी फेम केतकी कुलकर्णीचं पन्हाळा गडावर खास फोटोशूट

या अनुभवांमुळे कलाकारांवर असलेली जबाबदारी अधिक वाढते, असे ओंकारने स्पष्ट केले. मनोरंजन हे फक्त हसवण्यासाठी नसून, कधी कधी ते कोणाच्याही आयुष्यात आशेचा किरण ठरू शकते, हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित होते.