ADVERTISEMENT

ठरलं तर मगच्या ३ अभिनेत्री पोहोचल्या शेगावला; जुई गडकरी म्हणाली, त्यांनी बोलावल्याशिवाय जाणं होत नाही!

shegaon trip gajanan maharaj darshan jui gadkari priyanka tendolkar prajakta dighe : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील जुई गडकरी, प्रियांका तेंडोलकर आणि प्राजक्ता दिघे यांनी नुकतीच शेगावला जाऊन श्री गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. तीन वर्षांपासून ठरत असलेली ही ट्रिप अखेर पूर्ण झाल्याने अभिनेत्रींचा आनंद गगनात मावेनासा झाला असून जुईने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत या प्रवासातील सुंदर आठवणी चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत.
shegaon trip gajanan maharaj darshan jui gadkari priyanka tendolkar prajakta dighe

shegaon trip gajanan maharaj darshan jui gadkari priyanka tendolkar prajakta dighe:  ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळताना दिसतं. पडद्यावर कायम व्यस्त असणाऱ्या या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. अशातच मालिकेतील काही अभिनेत्रींच्या खास ट्रिपची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

मालिकेची मुख्य अभिनेत्री जुई गडकरीने काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सहकलाकारांसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये प्रियांका तेंडोलकर आणि प्राजक्ता दिघे या अभिनेत्री देखील दिसत होत्या. या फोटोमुळे तिन्ही अभिनेत्री कुठेतरी खास ठिकाणी फिरायला निघाल्याची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू झाली होती. त्यानंतर जुईने शेअर केलेल्या नव्या पोस्टमधून अखेर या ट्रिपचं रहस्य उलगडलं आहे.

जुई, प्रियांका आणि प्राजक्ता या तिघीही शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. जुईने या प्रवासाबद्दल लिहिताना भावनिक शब्दांत अनुभव व्यक्त केला आहे. गेली तीन वर्षे या ट्रिपचं नियोजन सुरू होतं, मात्र काही ना काही कारणामुळे जाणं पुढे ढकललं जात होतं, असं तिने सांगितलं. “त्यांनी बोलावल्याशिवाय जाणं होत नाही,” असं म्हणत जुईने या प्रवासामागील श्रद्धा व्यक्त केली.

मालिकेच्या चित्रीकरणामुळे कलाकारांना फारसा वेळ मिळत नाही. रोजच्या दीर्घ शूटिंग शेड्यूलमुळे ट्रिपचं नियोजन करणं कठीण होतं. त्यातच प्रचंड उष्ण वातावरण, प्रवासाची व्यवस्था आणि बुकिंगची चिंता होती. मात्र, शेवटी सर्व काही सुरळीत पार पडलं आणि शेगावमध्ये शांत वातावरणात श्री गजानन महाराजांचं दर्शन घेता आलं, याचा आनंद अभिनेत्रींच्या पोस्टमधून स्पष्ट दिसून आला.

या प्रवासादरम्यान तिन्ही अभिनेत्रीांनी भरपूर मजामस्ती देखील केली. गाडीत सीट बदलणे, खाऊ खाणे, UNO खेळणे, शेगावची प्रसिद्ध कचोरी चाखणे अशा अनेक छोट्या छोट्या क्षणांचा त्यांनी आनंद घेतला. स्टेशनवर ट्रेनची वाट पाहताना देखील त्यांनी पुन्हा UNO खेळत वेळ घालवला. मित्राच्या आईने बनवलेल्या जेवणावर ताव मारल्याचाही उल्लेख जुईने पोस्टमध्ये केला आहे.

हे पण वाचा.. वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये प्रेमाचा मोठा ट्विस्ट! स्वानंदीनं अखेर समरसमोर व्यक्त केल्या भावना

shegaon trip gajanan maharaj darshan jui gadkari priyanka tendolkar prajakta dighe

विशेष म्हणजे, स्टेशनवर पहिल्यांदाच बॅटरी बग्गीमध्ये बसल्याचा अनुभवही अभिनेत्रींसाठी वेगळाच ठरला. या संपूर्ण प्रवासामुळे मनाला शांतता मिळाल्याचं जुईने नमूद केलं आहे. प्रियांकाचे आभार मानत हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील, असंही तिने लिहिलं.

जुईच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मालिकेत अस्मिताची भूमिका साकारणारी मोनिका दबाडे हिने “मी ही ट्रिप मिस केली” अशी कमेंट करत पुढे सगळ्यांनी मिळून पुन्हा ट्रिपला जाऊया, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर जुईनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. याशिवाय मराठी मालिकाविश्वातील अनेक कलाकारांनी या तिघींच्या मैत्रीचं आणि साधेपणाचं कौतुक केलं आहे.

हे पण वाचा.. कान्स २०२६ मध्ये मराठमोळा जलवा! अभिनेता पुष्कर जोगची रेड कार्पेटवर दमदार एन्ट्री, म्हणाला “हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील

व्यस्त शूटिंग शेड्यूलमधून वेळ काढत श्रद्धा, मैत्री आणि आनंद यांचा सुंदर संगम अनुभवणाऱ्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अभिनेत्रींच्या या ट्रिपची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.