ADVERTISEMENT

मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेच्या सेटचं भव्य अनावरण; संघर्ष, विचार आणि इतिहासाचा जिवंत अनुभव

Savitribai Jyotirao Phule serial set inauguration : मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या स्टार प्रवाहवरील ऐतिहासिक मालिकेच्या भव्य सेटचं अनावरण पार पडलं असून सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनाचा जिवंत अनुभव देणारा हा क्षण ठरला.
Savitribai Jyotirao Phule serial set inauguration

Savitribai Jyotirao Phule serial set inauguration : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाला, जिद्दीला आणि समाजपरिवर्तनाच्या दूरदृष्टीला अभिवादन करणारी स्टार प्रवाहची बहुचर्चित ऐतिहासिक मालिका Mi Savitribai Jyotirao Phule आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच या मालिकेच्या भव्यदिव्य सेटचा अनावरण सोहळा पार पडला आणि या क्षणाने उपस्थित प्रत्येकाला इतिहासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर नेऊन ठेवलं.

या अनावरण सोहळ्याला मालिकेचे निर्माते आणि महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे, सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री मधुराणी गोखले, तसेच संपूर्ण कलाकार आणि तांत्रिक टीम उपस्थित होती. याशिवाय स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे यांनीही या ऐतिहासिक क्षणाला हजेरी लावली. हा सोहळा केवळ सेट उघडण्यापुरता मर्यादित नव्हता, तर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एका विचारक्रांतीचा नव्याने उलगडा करणारा ठरला.

Mi Savitribai Jyotirao Phule मालिकेसाठी उभारण्यात आलेला सेट सावित्रीबाईंच्या जीवनप्रवासाचं प्रतिबिंब वाटावा, अशा पद्धतीने साकारण्यात आला आहे. समाजाने उभे केलेले अडथळे, शिक्षणासाठी चाललेली लढाई आणि त्यावर मात करत पुढे जाणारी सावित्रीबाईंची जिद्द या सेटमधून ठळकपणे जाणवते. कलादिग्दर्शक नितीन कुलकर्णी यांच्या सखोल अभ्यासातून आणि कल्पकतेतून हा भावस्पर्शी अवकाश उभा राहिला आहे.

या वेळी मधुराणी गोखले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, सावित्रीबाई फुले यांच्यासारखं महान व्यक्तिमत्त्व साकारणं ही केवळ भूमिका नाही, तर मोठी जबाबदारी आहे. आज स्त्रिया मुक्तपणे शिकत आहेत, विविध क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करत आहेत, यामागे सावित्रीबाईंनी दीडशे वर्षांपूर्वी केलेला संघर्ष आहे, याची जाणीव या भूमिकेमुळे अधिक तीव्रतेने होते, असं त्यांनी नमूद केलं.

हे पण वाचा.. सावळा रंग आणि न्यूनगंड लोकप्रिय मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकरने सांगितला बालपणीचा अनुभव

या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे. विशेषतः ‘आई कुठे काय करते’नंतर मधुराणी गोखले पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर ऐतिहासिक भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. Mi Savitribai Jyotirao Phule ही मालिका ५ जानेवारीपासून सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार असून सावित्रीबाईंच्या जीवनातील संघर्ष, विचार आणि परिवर्तनाची प्रेरणादायी कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे.

हे पण वाचा.. तुझ्या सोबतीने’ : स्टार प्रवाहवर रात्री ९ वाजता रंगणार नवी प्रेमकथा

Savitribai Jyotirao Phule serial set inauguration