ADVERTISEMENT

तुझ्या सोबतीने’ : स्टार प्रवाहवर रात्री ९ वाजता रंगणार नवी प्रेमकथा

tuzya sobatine star pravah new serial telecast time date : तुझ्या सोबतीने या नव्या मालिकेतून माधवी निमकर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. स्टार प्रवाहने अखेर मालिकेची ऑनएअर तारीख आणि वेळ जाहीर केली असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
tuzya sobatine star pravah new serial telecast time date

tuzya sobatine star pravah new serial telecast time date : स्टार प्रवाह वाहिनी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी नवी, भावनिक आणि दमदार कथा घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वीच वाहिनीने मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय खलनायिका माधवी निमकर पुन्हा छोट्या पडद्यावर दिसणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं होतं. आता Tuzya Sobatine या नव्या मालिकेच्या प्रोमोमधून अखेर या मालिकेची प्रसारण वेळ आणि तारीख अधिकृतपणे समोर आली आहे.

Tuzya Sobatine या मालिकेमध्ये माधवी निमकर एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून तिच्या दमदार अभिनयामुळे मालिकेकडे विशेष लक्ष वेधलं गेलं आहे. या मालिकेची मुख्य कथा मल्हार आणि नुपूर या दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींभोवती फिरताना दिसणार आहे. नुपूरच्या भूमिकेत एतशा संझगिरी दिसणार असून तिने याआधी ‘छोटी मालकीण’ मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तिच्यासोबत अभिनेता अजिंक्य ननावरे मल्हारच्या भूमिकेत महत्त्वाची जबाबदारी साकारणार आहे.

स्टार प्रवाहने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमधून स्पष्ट झालं आहे की Tuzya Sobatine ही मालिका १२ जानेवारीपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. सध्या या वेळेत ‘नशीबवान’ ही मालिका सुरू असल्याने अनेक प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. ‘नशीबवान’चं पुढे काय होणार? मालिकेची वेळ बदलणार की ती ऑफ एअर होणार? अशा विविध चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहेत. काहींनी तर इतर मालिकांबाबतही तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याबाबत स्टार प्रवाहकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

कथेच्या दृष्टीने पाहिलं तर मल्हार हा लहानपणापासूनच अत्यंत हुशार, शिस्तप्रिय आणि परफेक्शनवर विश्वास ठेवणारा तरुण आहे. आईचं छत्र लहानपणीच हरवल्यामुळे त्याच्यासाठी तायडी हीच आईसमान ठरते. तिच्यावर त्याचं अपार प्रेम असून कुटुंबासाठी तो कोणताही त्याग करायला तयार असतो. प्रेम आणि लग्न या संकल्पनांवर मात्र त्याचा विश्वास नाही. दुसरीकडे नुपूरचा विचारविश्व आणि स्वभाव पूर्णपणे वेगळा आहे.

हे पण वाचा.. सेटवरील पहिली भेटीतील भांडण ते हटके प्रपोजल: श्वेता शिंदेची खास प्रेमकहाणी

कामाच्या निमित्ताने हे दोन भिन्न विचारांचे व्यक्तिमत्त्व एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यातील नातं कसं फुलतं, कोणते संघर्ष आणि भावनिक क्षण येतात, हे सगळं Tuzya Sobatine मधून उलगडणार आहे. हृदयस्पर्शी कथा, प्रभावी कलाकार आणि दमदार सादरीकरणामुळे ही मालिका प्रेक्षकांचं लक्ष नक्कीच वेधून घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा.. माझा मुलगा चार वर्षांपासून तिच्यापासून वेगळा आहे…हेमलता बाणे खंडणी प्रकरणावर अर्चना पाटकर यांचा ठाम खुलासा, ‘आमच्याशी कोणताही संबंध नाही’

tuzya sobatine star pravah new serial telecast time date