savalyachi janu savli actress prapti redkar cute video marathi serial : मराठी टेलिव्हिजनवरील “सावळ्याची जणू सावली” ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरते आहे. मालिकेत अलीकडेच झालेल्या लीपनंतर कथानकाला नवं वळण मिळालं असून सावलीच्या आयुष्यात अनेक बदल घडताना पाहायला मिळत आहेत. या नव्या टप्प्यात सावलीच्या आयुष्यात मातृत्वाची एंट्री झाली असून ती जुळ्या मुलांची आई झालेली दाखवली आहे.
या भूमिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर झळकत आहे. विशेष म्हणजे, प्राप्तीचं वय फक्त २२ वर्षं असून इतक्या कमी वयात ती ऑनस्क्रीन आईची जबाबदारी अतिशय सहजतेने पार पाडताना दिसतेय. तिच्या अभिनयात परिपक्वता आणि भावनिक गहिराई स्पष्ट जाणवते, त्यामुळे प्रेक्षक तिच्या भूमिकेशी सहज जोडले जात आहेत.
मालिकेत सावलीच्या जुळ्या मुलांची नावं ओवी आणि अबीर अशी ठेवण्यात आली आहेत. ही पात्रं साकारणारे बालकलाकार साईराज केंद्रे आणि वेदांती भोसले यांनी देखील अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विशेष म्हणजे, शूटिंगदरम्यान या तिघांमध्ये ऑफस्क्रीन खूप छान केमिस्ट्री तयार झाल्याचं दिसून येतं.
याचाच प्रत्यय नुकत्याच व्हायरल झालेल्या एका क्यूट व्हिडीओमधून आला आहे. या व्हिडीओमध्ये साईराज आणि वेदांती मिळून प्राप्तीचा मेकअप करताना दिसतात. साईराज तिच्या चेहऱ्यावर पावडर लावताना दिसतो, तर वेदांती तिचे केस सेट करताना मजा करताना दिसते. शेवटी दोघं मिळून तिचा आय मेकअप करतात आणि प्राप्तीही अगदी आनंदाने त्यांच्याकडून मेकअप करून घेते. हा व्हिडीओ पाहताना त्यांच्या निरागस नात्याची आणि जुळलेल्या बॉण्डिंगची झलक स्पष्ट दिसते.
प्राप्तीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना “मुले ही देवाघरची फुले” असं सुंदर कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून अनेकांनी या तिघांच्या केमिस्ट्रीचं कौतुक केलं आहे. “खूप गोड व्हिडीओ”, “ऑफस्क्रीन बॉण्डिंग जबरदस्त आहे”, “चिमुकले खूप क्यूट आहेत” अशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
हे पण वाचा.. स्वराज्यरक्षक संभाजी’तील बाळ संभाजी आता ओळखूच येणार नाही; लूक पाहून चाहते हैराण!
दरम्यान, साईराज केंद्रे याने यापूर्वी “आमच्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यामुळे लोकप्रियता मिळवली होती, तर वेदांती भोसले “ड्रामा ज्युनिअर्स” या शोमुळे घराघरात ओळख निर्माण केली आहे. या दोघांच्या एंट्रीमुळे मालिकेत आणखी रंगत आली आहे.
हे पण वाचा.. सखी गोखलेची सुव्रत जोशीसाठी रोमँटिक पोस्ट
savalyachi janu savli actress prapti redkar cute video marathi serial
“सावळ्याची जणू सावली” ही मालिका सध्या दुपारी १ वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित होत असून लीपनंतरच्या कथानकामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.









