ADVERTISEMENT

सावळ्याची जणू सावली मालिकेत ऐश्वर्याची कारस्थानं उघड, मेहेंदळे कुटुंबाला मोठा धक्का

Savalyachi Janu Savali aishwaryas truth exposed : सावळ्याची जणू सावली मालिकेत अखेर ऐश्वर्याची सगळी कारस्थानं समोर येणार असून, नव्या प्रोमोमुळे मेहेंदळे कुटुंबात मोठा भावनिक आणि नाट्यमय संघर्ष पाहायला मिळणार आहे.
Savalyachi Janu Savali aishwaryas truth exposed

Savalyachi Janu Savali aishwaryas truth exposed : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Savalyachi Janu Savali सध्या प्रचंड चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेच्या कथानकात एकामागून एक धक्कादायक वळणं येताना दिसत आहेत. अनेक गुपितं उघड होत असून प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आधी भैरवी, तारा आणि सावली यांच्याशी संबंधित मोठं सत्य समोर आलं आणि आता आणखी एका महत्त्वाच्या पात्राची खरी ओळख उघड होण्याची वेळ आली आहे.

याआधी सावली हीच खरी गायिका असल्याचं सर्वांसमोर आलं होतं. तारासाठी ती पडद्यामागे गाणी गात होती आणि हे सगळं भैरवीने आखलेलं होतं, हे सत्य उघड झाल्यानंतर मेहेंदळे घरात मोठी उलथापालथ झाली. खोटेपणामुळे ताराला घर सोडावं लागलं आणि भैरवी-तारा यांच्या नात्यात कायमची दरी निर्माण झाली. या सगळ्या घडामोडींनंतरही घरातल्या कारस्थानांचा खेळ थांबलेला नव्हता.

मेहेंदळे कुटुंबाची सून ऐश्वर्या मेहेंदळे ही सातत्याने कट-कारस्थानं रचताना दिसत होती. घरात आणि इंडस्ट्रीमध्ये सर्व अधिकार फक्त आपल्याकडेच असावेत, यासाठी ती प्रत्येकाची वाट अडवत होती. इतर सुना पुढे जाऊ नयेत, कोणालाही मान-सन्मान मिळू नये, यासाठी तिचे प्रयत्न सुरूच होते. इतकंच नाही तर तिला मूल नको असल्यामुळे अमृतालाही मातृत्वापासून दूर ठेवण्याचा घृणास्पद डाव तिने रचल्याचं आता स्पष्ट होत आहे.

Savalyachi Janu Savali च्या नव्या प्रोमोमध्ये हे सगळं सत्य एकदम समोर येताना दिसत आहे. मेहेंदळे कुटुंब एकत्र जमलेलं असताना भैरवी पुढे येते आणि सावलीच्या अपहरणामागे ऐश्वर्याचाच हात असल्याचा आरोप करते. पुराव्यासाठी दाखवलेल्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या स्वतः कबुली देताना दिसते की कार्यक्रमातून सावलीला तिनेच गायब केलं होतं. हा व्हिडीओ पाहून घरातल्या प्रत्येकालाच मोठा धक्का बसतो.

यानंतर सावली आणखी एक भयानक सत्य उघड करते. अमृताला बाळ का होत नव्हतं, याचं कारण औषधाच्या नावाखाली दिलेलं विष असल्याचं ती सांगते. हे ऐकताच अमृता कोसळते, तर तिलोत्तमाचा राग अनावर होतो. अखेर तिलोत्तमा ऐश्वर्याला घरातून हाकलून देण्याचा निर्णय घेत असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं.

हे पण वाचा.. भाऊ मानलं होतं, पण साथ दिली नाही; बिग बॉस मराठी ६ मध्ये रोशन-तन्वी वाद

झी मराठीने “अखेर ऐश्वर्याची सगळी कारस्थानं उघड होणार” अशी कॅप्शन देत हा प्रोमो शेअर केला असून, प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. आता Savalyachi Janu Savali मालिकेत पुढे काय घडणार, ऐश्वर्याला तिच्या कृत्यांची शिक्षा मिळणार का, हे पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे पण वाचा.. बिग बॉसचा जुना वाद पुन्हा पेटणार? आर्या जाधव ची ‘The 50’ मध्ये एण्ट्री, निक्कीसोबत आमनेसामने येणार

Savalyachi Janu Savali aishwaryas truth exposed