ADVERTISEMENT

पती सोहम बांदेकरच्या वाढदिवशी पूजा बिरारीची खास पोस्ट

pooja birari special post for husband soham bandekar birthday : अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर पूजा बिरारी हिने पती सोहम बांदेकरच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या खास पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. प्रेम, मस्ती आणि भावनांनी भरलेल्या या पोस्टमध्ये पूजाने सोहमबद्दलच्या भावना अतिशय हटके अंदाजात व्यक्त केल्या आहेत.
pooja birari special post for husband soham bandekar birthday

pooja birari special post for husband soham bandekar birthday : पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर ही जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. त्यांच्या रिलेशनशिपमधील गोड क्षण, मजेशीर व्हिडीओ आणि एकमेकांवरील प्रेम व्यक्त करणाऱ्या पोस्टमुळे चाहतेही या जोडीवर भरभरून प्रेम करताना दिसतात. आता पुन्हा एकदा पूजा बिरारीने तिच्या पतीसाठी केलेली खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोहम बांदेकरच्या वाढदिवसानिमित्त पूजाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही खास फोटो शेअर करत एक भावनिक आणि मजेशीर कॅप्शन लिहिलं आहे. या पोस्टमध्ये तिने सोहमबद्दलच्या भावना अगदी मनमोकळ्या शब्दांत व्यक्त केल्या आहेत. “मला एकाच वेळी त्रास देणारा, हसवणारा आणि शांत करणारा तूच आहेस,” अशा आशयाच्या शब्दांत तिने आपल्या नात्याचं सुंदर वर्णन केलं आहे.

पूजाने पोस्टमध्ये सोहमच्या स्वभावाबद्दल बोलताना त्याच्या विनोदी स्वभावाचं आणि हुशारीचंही कौतुक केलं. “तुझ्यासारखा माणूस आयुष्यात एकदाच भेटतो,” असं म्हणत तिने सोहम तिच्यासाठी किती खास आहे हे स्पष्ट केलं. त्याचबरोबर त्यांच्या नात्यातील मजेशीर क्षणांचाही उल्लेख तिने केला आहे. “तुझ्या ओव्हरस्मार्टपणात आणि तुझ्या मिठीत मी हरवून गेले,” अशा रोमँटिक शब्दांनी तिने चाहत्यांची मनं जिंकली.

विशेष म्हणजे पोस्टमध्ये फक्त प्रेमच नाही तर त्यांच्या नात्यातील हलकीफुलकी मस्तीही पाहायला मिळते. “इतकं कौतुक करूनही माझ्या रोजच्या आय-रोल वर्कआउटसाठी तू अजूनही ६० टक्के जबाबदार आहेस,” असं म्हणत तिने मजेशीर अंदाजात सोहमची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे ही पोस्ट चाहत्यांना आणखीच आवडली आहे.

पूजाच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी कमेंट करत सोहमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी या जोडीला ‘कपल गोल्स’ म्हटलं तर काहींनी त्यांच्या नात्यातील प्रामाणिकपणाचं कौतुक केलं. सोशल मीडियावर सध्या ही पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर होत असून चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत.

हे पण वाचा.. नारळपाणी, अंडी अन् घरगुती जेवण; फिट राहण्यासाठी अभिनेत्री शिवानी मुंढेकरचा खास डाएट प्लॅन चर्चेत

pooja birari special post for husband soham bandekar birthday

मनोरंजन विश्वात अनेक जोड्या चर्चेत असतात, मात्र पूजा आणि सोहम यांचं नातं हे त्यातील सहज, गोड आणि वास्तववादी नात्यांपैकी एक मानलं जातं. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचं विशेष लक्ष असतं. आता पूजाने शेअर केलेल्या या वाढदिवसाच्या पोस्टने पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे.

हे पण वाचा.. हार्दिक जोशी आणि अमोल नाईकच्या ‘थायलंड डायरीज’ची सोशल मीडियावर चर्चा; फोटो झाले व्हायरल