Raid 2 चा दणका! अजय देवगनच्या ‘रेड २’नं जगभरात केला जबरदस्त गल्ला, १५० कोटींच्या पार कमाई
२०१८ मधील हिट चित्रपट ‘रेड’चा सिक्वेल असलेला ‘रेड २’ हा चित्रपट अजय देवगनच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवतो आहे. राजकुमार गुप्ता दिग्दर्शित ही क्राइम थ्रिलर सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजत असून, आतापर्यंत १५० कोटी रुपयांचा टप्पा पार करत एक नवा उच्चांक गाठला आहे. Raid 2