ADVERTISEMENT

‘लक्ष्मी निवास’ फेम दिव्या पुगावकरचा ऑनस्क्रीन नवऱ्याबद्दल खुलासा; म्हणाली – ‘हा तर खूप साधा भोळा आहे’ laxmi nivas

Laxmi Nivas : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मी निवास प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून या मालिकेतील जयंत आणि जान्हवी ही जोडी सध्या चर्चेत आहे. या जोडीची भूमिका मेघन जाधव आणि दिव्या पुगावकर साकारत असून, त्यांच्यातील ट्यूनिंग पाहून प्रेक्षक त्यांना खूप पसंत करत आहेत. नुकतेच झी मराठी अवॉर्ड्स २०२५ सोहळ्यात दोघेही आकर्षक अंदाजात रेड कार्पेटवर हजर राहिले. यावेळी त्यांनी दिलेल्या मुलाखतीत दिव्याने मेघनबद्दल मजेशीर खुलासा केला आहे.

रेड कार्पेटवर लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सुरुवातीला दिव्या आणि मेघन यांनी त्यांच्या लूकबद्दल, तसेच मिळालेल्या नामांकनाबद्दल आनंद व्यक्त केला. पहिला फोन कोणाला केला, असे विचारले असता दिव्या म्हणाली, “मी लगेच माझ्या नवऱ्याला व्हिडिओ कॉल केला.” तर मेघनने उत्तर देताना सांगितले की त्याने आई-वडिलांना आणि भावाला फोन केला.

सूरज चव्हाणच्या ड्रीम होमची पहिली झलक; बहिण अंकिता वालावलकरने शेअर केला खास व्हिडिओ

यावेळी दिव्याने थट्टेच्या सुरात मेघनला विचारले, “आणखी कोणाला फोन केला होतास? कानात सांग नाहीतर माइकवर सगळ्यांना सांगते.” त्यावर मेघनने हसत उत्तर दिले की, “असं काही लपवून सांगायचं नसतं.” या संवादातूनच दोघांची मस्करी सुरू झाली. दिव्याने पुढे मेघनच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराचा विषय छेडला आणि म्हणाली, “हा तर खूप साधा-भोळा आहे.”

दिव्याला पुढे विचारण्यात आले की मेघन ऑनस्क्रीन जसा दिसतो, तसाच खऱ्या आयुष्यातही आहे का? यावर ती म्हणाली, “मेघन अजिबात जयंतसारखा नाही. तो नेमका कसा आहे, ते त्याची खरी जोडीदार नक्की सांगेल.” तिच्या या विधानावर मेघननेही गमतीशीर प्रतिक्रिया देत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

लक्ष्मी निवास या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेली ही जोडी केवळ पडद्यावरच नाही तर पडद्यामागेही आपली मैत्री आणि केमिस्ट्री दाखवत असल्याचे या मुलाखतीतून दिसून आले. झी मराठीवरील या मालिकेने काहीच दिवसांत प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी छाप पाडली आहे, आणि दिव्या-मेघनची ही मस्तीमय मुलाखत प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी ठरली आहे.

Leave a Comment