ADVERTISEMENT

फॉरेनची पाटलीण’ फेम गिरीश परदेशीने १० वर्ष अभिनयापासून का घेतला ब्रेक? अभिनेता म्हणाला…

girish pardeshi 10 years acting break reason : ‘फॉरेनची पाटलीण’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता गिरीश परदेशी जवळपास दशकभर अभिनयविश्वापासून दूर होता. आता त्याने या ब्रेकमागचं खरं कारण सांगत नव्या प्रवासाबद्दल खुलासा केला आहे.
girish pardeshi 10 years acting break reason

girish pardeshi 10 years acting break reason : २००७ साली प्रदर्शित झालेला ‘फॉरेनची पाटलीण’ हा मराठी चित्रपट त्या काळात प्रचंड चर्चेत आला होता. ग्रामीण ढंगाची कथा, विनोदी शैली आणि कलाकारांच्या अभिनयामुळे या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटातून अभिनेता गिरीश परदेशी हे नाव विशेष चर्चेत आलं. साधा, देखणा आणि नैसर्गिक अभिनय करणारा हा अभिनेता अल्पावधीतच प्रेक्षकांचा आवडता बनला. त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये तो मुख्य भूमिकांमध्ये झळकत राहिला. मात्र काही वर्षांनी तो अचानक अभिनयविश्वातून गायब झाल्याचं पाहायला मिळालं.

२०१६ नंतर गिरीश परदेशी कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसला नाही. त्यामुळे अनेक चाहत्यांना त्याने अभिनय क्षेत्र कायमचं सोडलं का? असा प्रश्न पडला होता. आता तब्बल दहा वर्षांनंतर त्याने स्वतः या ब्रेकमागचं कारण स्पष्ट केलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना गिरीशने सांगितलं की, सतत काम करत असतानाच त्याला स्वतःबद्दल नव्याने विचार करण्याची गरज वाटू लागली होती. अभिनय क्षेत्रात काम करताना केवळ शूटिंगच नव्हे, तर स्वतःला सतत अपडेट ठेवणं, मार्केटिंग, नेटवर्किंग या गोष्टींमध्येही पूर्ण वेळ द्यावा लागतो. या सततच्या धावपळीमुळे तो मानसिकदृष्ट्या थकला होता. त्यामुळे थोडा वेळ थांबून स्वतःला समजून घेण्याचा निर्णय त्याने घेतला.

गिरीश परदेशी हा ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चा विद्यार्थी आहे. अभिनयातील त्याच्या अनुभवामुळे त्याला विविध संस्थांमधून अभिनय आणि थिएटर शिकवण्यासाठी ऑफर्स येऊ लागल्या. सुरुवातीला केवळ प्रयोग म्हणून सुरू केलेलं हे काम पुढे त्याच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनलं. विद्यार्थ्यांना अभिनय शिकवताना स्वतःच्या कौशल्यांवरही काम करता आलं आणि अभिनयाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला, असं त्याने सांगितलं.

या काळात त्याने केवळ अभिनय प्रशिक्षणच दिलं नाही, तर शिक्षण क्षेत्रातही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. पुण्यातील एका नामांकित मास कम्युनिकेशन कॉलेजमध्ये तो जवळपास दीड वर्ष संचालक पदावर कार्यरत होता. मार्केटिंगपासून अॅडमिशन प्रक्रिया, अभ्यासक्रम नियोजन, परीक्षा व्यवस्थापन आणि फी रिकव्हरीपर्यंत अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या त्याने सांभाळल्या. या अनुभवामुळे त्याच्यातील व्यवस्थापन कौशल्यही विकसित झालं.

हे पण वाचा.. मी अभिमानी हिंदू आहे, पण अंधभक्त नाही; शशांक केतकरचं देवाविषयी स्पष्ट मत

girish pardeshi 10 years acting break reason

मुख्य प्रवाहातील सिनेमांमध्ये काम करताना प्रायोगिक रंगभूमीवर काम करण्याची इच्छा अपुरी राहिली होती. मात्र या ब्रेकदरम्यान त्याला थिएटरमध्ये मनापासून काम करण्याची संधी मिळाली. गेल्या काही वर्षांत त्याने हजारो विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे दिले असून अनेक नवोदित कलाकार घडवण्यात त्याचा मोठा वाटा आहे.

हे पण वाचा.. मी सिनेसृष्टी सोडलेली नाही’, ‘गाढवाचं लग्न’मधील गंगीचा स्पष्ट खुलासा

आता या सर्व अनुभवांनंतर गिरीश परदेशी पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनय, शिक्षण आणि व्यवस्थापन अशा तिन्ही क्षेत्रातील अनुभवामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वात मोठा बदल झाल्याचं त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होतं. त्यामुळे आगामी काळात तो कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.