ADVERTISEMENT

गिरीजा प्रभूचं हिंदी टीव्हीत पदार्पण; ‘तीस के पार जब मिला प्यार’मध्ये मुख्य भूमिका

girija prabhu hindi tv debut Tees ke par jab mila pyar serial : मराठी मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री "गिरीजा प्रभू" आता हिंदी मालिकांमध्ये झळकणार असून "तीस के पार जब मिला प्यार" या मालिकेतून तिचा नवा अध्याय सुरू होत आहे.
girija prabhu hindi tv debut Tees ke par jab mila pyar serial

girija prabhu hindi tv debut Tees ke par jab mila pyar serial : मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गिरीजा प्रभू आता हिंदी मनोरंजनविश्वात पदार्पण करत आहे. आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी गिरीजा नव्या मालिकेद्वारे एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

गिरीजाने आपल्या करिअरची सुरुवात नृत्य क्षेत्रातून केली होती. ‘युवा डान्सिंग क्वीन’ या कार्यक्रमामुळे ती प्रकाशझोतात आली आणि त्यानंतर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात दमदार एन्ट्री घेतली. पहिल्याच मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. यानंतर ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेतही ती झळकली.

आता गिरीजा नव्या टप्प्यात प्रवेश करत असून ती हिंदी मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘दंगल टीव्ही’वरील “तीस के पार जब मिला प्यार” या मालिकेतून ती हिंदी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या मालिकेत गिरीजासोबत अभिनेता पुलकीत जैन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांसाठी नवी आणि उत्सुकता वाढवणारी ठरत आहे. कथानकाच्या दृष्टीने ही मालिका एका ३२ वर्षांच्या महिलेभोवती फिरते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या या पात्राला समाजाकडून लग्नाविषयी टोमणे ऐकावे लागतात.

मात्र, तिच्या आयुष्यात एका मोकळ्या स्वभावाच्या आणि बिंदास्त जीवन जगणाऱ्या तरुणाची एन्ट्री होते आणि तिथून तिच्या आयुष्याला नवा वळण मिळतं. जबाबदाऱ्यांनी दबलेली मुलगी आणि मुक्त विचारांचा मुलगा यांची ही गोष्ट प्रेक्षकांना भावेल, अशी अपेक्षा आहे.

हे पण वाचा.. बालीत सुट्टी एन्जॉय करताना श्रिया पिळगांवकर सोशल मीडियावरील फोटोंनी वेधलं सगळ्यांचं लक्ष

३० वर्षांनंतर प्रेम सापडणं, समाजाच्या चौकटीत अडकलेल्या विचारांना आव्हान देणं आणि आयुष्य नव्याने जगण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टी मालिकेतून उलगडताना दिसणार आहेत.

हे पण वाचा.. सिंहगडावर राजसी भावे आणि अभिषेक देशमुखची ट्रेकिंग मस्ती; कांदा भजी खातानाचा फोटो व्हायरल

girija prabhu hindi tv debut tis ke par jab mila pyar serial

मालिकेच्या प्रीमियरची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी, लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. गिरीजासाठी ही संधी तिच्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, तिच्या हिंदी पदार्पणाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.