devmanus fame kiran gaikwad wife vaishnavi viral video : मराठी मनोरंजनविश्वात “देवमाणूस” या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड सध्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. १४ डिसेंबर २०२४ रोजी त्याने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत लग्नगाठ बांधली. या जोडीने “देवमाणूस २” मध्ये एकत्र काम करत प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. लग्नानंतर वैष्णवीच्या माध्यमातून किरणला “कोकणचा जावई” अशीही ओळख मिळाली आहे.
वैष्णवी सोशल मीडियावर सक्रिय असून ती वेळोवेळी आपल्या कोकणातील माहेरच्या आठवणी, पारंपरिक जीवनशैली आणि खास खाद्यसंस्कृतीचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिचा आणखी एक व्हिडीओ प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आला आहे. या व्हिडीओमध्ये ती कोकणातील माडाच्या झाडावर शिडीच्या सहाय्याने चढताना दिसते.
विशेष म्हणजे, ती फक्त झाडावर चढून थांबत नाही, तर कोयत्याच्या मदतीने ताजे नारळ स्वतः काढताना दिसते. त्यानंतर खाली उतरून पारंपरिक पद्धतीने नारळ सोलतानाही ती सहजतेने काम करताना दिसते. या संपूर्ण प्रक्रियेत तिची धडाडी आणि आत्मविश्वास स्पष्टपणे जाणवतो. कोकणातील नैसर्गिक जीवनशैलीचा अनुभव ती किती मनापासून घेत आहे, हे या व्हिडीओतून दिसून येते.
हे पण वाचा.. उन्हाळ्यात त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी माधवी निमकरची खास टिप्स; ताडगोळ्याच्या पेयाची सोपी रेसिपी शेअर
या व्हिडीओला तिने एक लोकप्रिय गाणं जोडत अधिक आकर्षक बनवलं आहे, ज्यामुळे तो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. चाहत्यांनी तिच्या या धाडसाचं आणि साधेपणाचं कौतुक करत कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिच्या कौशल्याचं कौतुक करत “खरं कोकणचं सौंदर्य” असंही म्हटलं आहे, तर काहींनी तिच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
याआधीही वैष्णवीने कोकणातील खास पदार्थ, विशेषतः ओल्या काजूगराची भाजी बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तिच्या पोस्ट्समधून कोकणातील निसर्ग, परंपरा आणि साधेपणाचं दर्शन घडतं.
हे पण वाचा.. ऑनस्क्रीन सासू-सुनेची जोडी पुन्हा एकत्र; शर्मिला शिंदेची हर्षदा खानविलकर साठी भावुक पोस्ट
devmanus fame kiran gaikwad wife vaishnavi viral video
दरम्यान, वैष्णवीने “काजळमाया” मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. मात्र, ही मालिका लवकर संपल्याने तिच्या पुढील प्रोजेक्टबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. छोट्या पडद्यावर तिचं कमबॅक कधी होणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.









