bigg boss marathi 6 mahesh mote janhavi killekar controversy : बिग बॉस मराठी 6 च्या सहाव्या पर्वाची ११ जानेवारीपासून जोरदार सुरुवात झाली असून यंदा घरात १७ स्पर्धकांनी एन्ट्री घेतली आहे. शो सुरू झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असतानाच, आता एक वेगळाच वाद चर्चेत आला आहे. सोशल मीडिया स्टार महेश मोटेने बिग बॉस मराठीच्या टीमविरोधात गंभीर आरोप करत व्हिडीओ शेअर केला असून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
साडेतीन लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या महेश मोटेने या व्हिडीओमध्ये दावा केला आहे की, बिग बॉस मराठीच्या टीमने त्याला मुंबईला मीटिंगसाठी बोलावले होते. मात्र, येण्या-जाण्याचा खर्च दिला गेला नाही. एवढंच नाही तर, दीड ते पावणे दोन महिने त्याला सिलेक्शनबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही, असंही त्याचं म्हणणं आहे. सिलेक्शन न झाल्याचं दुःख नसून, झालेल्या खर्चाची भरपाई मिळावी, ही त्याची प्रमुख मागणी असल्याचं तो सांगतो. याशिवाय, लवकरच पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार असल्याचाही त्याने उल्लेख केला आहे.
महेश मोटेचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री आणि Bigg Boss Marathi च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक Janhavi Killekarने थेट आणि परखड कमेंट करत त्याला सवाल केला. “हा काय मूर्खपणा आहे? एखाद्या जॉबच्या इंटरव्ह्यूला गेल्यावर रिजेक्शन मिळालं, तर आपण कंपनीकडे प्रवासाचा खर्च मागतो का?” असा सवाल तिने उपस्थित केला. तसेच, बिग बॉससारख्या शोसाठी शेकडो लोकांचे इंटरव्ह्यू होतात, हेही तिने स्पष्ट केलं.
Janhavi Killekarच्या या कमेंटनंतर महेश मोटेने पुन्हा एक व्हिडीओद्वारे उत्तर दिलं. बिग बॉस ही जॉब इंटरव्ह्यूसारखी प्रक्रिया नसून, ती एक क्रिएटिव्ह मीटिंग होती, असा त्याचा दावा आहे. “मी फेमस असल्यामुळेच त्यांनी स्वतःहून मला संपर्क केला होता. मीटिंगनंतरही रिझल्ट न सांगणं चुकीचं आहे,” असं म्हणत त्याने पुन्हा एकदा आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचं दाखवलं.
हे पण वाचा.. नवरी मिळे हिटलरला फेम राकेश बापटची बिग बॉस मराठी ६ मध्ये दमदार एन्ट्री; सहकलाकाराकडून खास शुभेच्छा
दरम्यान, Janhavi Killekarच्या समर्थनार्थ तिच्या चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचं मत योग्य असल्याचं सांगत, अशा व्हिडीओंना फारसं महत्त्व देऊ नये, असा सल्लाही अनेकांनी दिला आहे. Bigg Boss Marathi 6 सध्या घरातील खेळामुळे जितका चर्चेत आहे, तितकाच हा वादही चर्चेचा विषय ठरत आहे. पुढील काळात या प्रकरणावर आयोजकांची काय भूमिका असते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे पण वाचा.. पहिल्याच दिवशी वादाचा भडका! बिग बॉस मराठी सीझन ६ च्या प्रोमोमध्ये तन्वी-रुचिता आमनेसामने









