ADVERTISEMENT

बिग बॉस मराठी 6 येतंय, कलर्स मराठीने शेअर केला टीझर Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6 कलर्स मराठीने अखेर बिग बॉस मराठी 6 ची अधिकृत घोषणा करत धमाकेदार टीझर प्रदर्शित केला आहे. बिग बॉस मराठी 5 च्या सुपरहिट यशानंतर प्रेक्षकांमध्ये नव्या पर्वाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र सगळ्यांना पडलेला मोठा प्रश्न असा—या वर्षी बिग बॉस मराठी 6 कोण होस्ट करणार?
Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6 बिग बॉस मराठी 5 च्या घवघवीत यशानंतर अखेर बिग बॉस मराठी 6 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नुकतंच कलर्स मराठीने बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाचा एक धमाकेदार टीझर प्रदर्शित केला आहे.

याआधी, कलर्स मराठीने संध्याकाळी सात वाजून सात मिनिटांनी “काहीतरी धमाकेदार येत आहे” असं सांगत एक व्हिडिओ शेअर केला होता. ( Bigg Boss Marathi 6 Date) त्यानंतर चाहत्यांमध्ये बिग बॉस मराठी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. अखेर ही चर्चा खरी ठरली असून, कलर्स मराठीने बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची घोषणा अधिकृतपणे केली आहे.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा विजेता सुरज चव्हाण ठरला होता. अभिजीत सावंत आणि निकिता तांबोळी यांच्या तुलनेत शेवटी सुरज अधिक मतं मिळवत विजयी झाला. प्रेक्षकांचे प्रेम आणि प्रचंड वोटिंग हीच त्याच्या विजयाची मोठी कारणं ठरली. विशेष म्हणजे, अभिनेता रितेश देशमुखच्या होस्टिंगमुळे बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन हा या शोच्या इतिहासातील सर्वात सुपरहिट पर्व ठरला होता.

मात्र अचानक कार्यक्रम संपवण्यात आल्यामुळे, “हिंदी बिग बॉस सुरू होत असल्याने सिझन लवकर बंद केला,” असा आरोप अनेक चाहत्यांनी केला होता. आता बिग बॉस हिंदी 19 शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत असतानाच कलर्स मराठीने बिग बॉस मराठी 6 ची घोषणा केली आहे.

कलर्स मराठीने शेअर केलेल्या या टीझरवर चाहत्यांनी कमेंट्समध्ये जबरदस्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र सगळ्यांच्या मनातला मोठा प्रश्न अजूनही तसाच आहे—यंदा बिग बॉस मराठीचा सहावा सिझनही रितेश देशमुखच होस्ट करणार का? हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.