Ashok Mama Serial Actress Exit : ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘अशोक मा.मा.’ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि अगदी कमी काळातच या मालिकेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रसिका वाखारकर यांच्या दमदार अभिनयाने ही कथा अधिक रंगतदार झाली. त्याचबरोबर या मालिकेद्वारे शुभवी गुप्ते हिनेही अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. शुभवी ही अभिनेते लोकेश गुप्ते आणि अभिनेत्री चैत्राली गुप्ते यांची कन्या आहे.
‘अशोक मा.मा.’ Ashok Mama या मालिकेत शुभवीने संयमी या अशोक सराफ यांच्या मोठ्या नातीची भूमिका साकारली होती. तिचा निरागस चेहरा आणि सहज अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. परंतु अलीकडेच शुभवीने या मालिकेतून एक्झिट घेतली असून तिचा शेवटचा सीन पूर्ण झाला आहे. या प्रसंगी शुभवीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत अशोक सराफ यांना खास शब्दांत धन्यवाद दिले.
तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “मामा, मी तुमच्याबद्दल काय बोलू? कारण तुमच्यासोबत काम करणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभूती होती. तुम्ही फक्त एक दिग्गज कलाकार नाही, तर संपूर्ण इंडस्ट्रीसाठी आदर्श आहात. सेटवर प्रत्येकाशी आपुलकीने वागणं, सर्वांचं नाव लक्षात ठेवणं आणि नेहमी आनंद देणं — या सगळ्या गोष्टी मी तुमच्याकडून शिकले. तुम्ही शिकवलेला विनम्रतेचा आणि आदराचा धडा मी आयुष्यभर लक्षात ठेवेन.”
तिने पुढे लिहिले की, “हा कदाचित माझा शेवटचा सीन असू शकतो, पण ‘अशोक मा.मा.’ या प्रवासात मिळालेलं तुमचं प्रेम आणि मार्गदर्शन मी कधीही विसरणार नाही.”
दरम्यान, Ashok Mama मालिकेबाबत आणखी एक खास बातमी समोर आली आहे — लवकरच या कथेत ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ प्रवेश करणार आहेत. यानिमित्ताने प्रेक्षकांना प्रथमच छोट्या पडद्यावर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही सुपरहिट जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अधिरासारखी…’, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ फेम राज मोरे बोलला खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल म्हणाला.









