ankita walawalkar dhananjay powar bhaubeej post : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनमध्ये भाऊ-बहिणीच्या अनोख्या नात्याने प्रेक्षकांची मने जिंकलेली जोडी म्हणजे अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार. या दोघांची गोड ट्युनिंग, निखळ भाऊगिरी आणि एकमेकांवरील प्रेमामुळे ते घराघरांत लोकप्रिय झाले होते. मात्र आता हीच जोडी एका भावनिक कारणामुळे चर्चेत आली आहे.
अंकिता वालावलकरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भाऊबीजेच्या दिवशी डीपी दादाने म्हणजेच धनंजय पोवारने फोन न केल्याची खंत व्यक्त केली आहे. आपल्या खास पद्धतीत अंकिताने लिहिलं, “धनंजय पोवार या भावाने मला भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या नाहीत… भाऊबीजेला भावाने बहिणीकडे यायचं असतं, पण यायला नाही जमलं तर एक कॉल तरी केला असता ना?” या ओळींमधून तिचा नाराज सूर स्पष्ट दिसून येतो.
अंकिताची ही स्टोरी व्हायरल होताच धनंजय पोवारनेही त्यावर तत्काळ प्रतिसाद दिला. आपल्या लाडक्या बहिणीची स्टोरी रिशेअर करत डीपी दादाने लिहिलं, “भाऊ दिवाळीच्या कामात व्यग्र होता, वाटलं बहिणीने समजून घेतले असेल. पण माझी ही एक चूक समजून माफ कर. लवकरच तुझ्यासाठी एक खास गिफ्ट घेऊन येईन.” या भावनिक उत्तराने चाहत्यांची मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत.
या प्रसंगानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनीही या दोघांच्या नात्याबद्दल गोड प्रतिक्रिया दिल्या. काहींनी धनंजयला “बिझी भाऊ” म्हटलं, तर काहींनी अंकिताच्या मनमोकळेपणाचं कौतुक केलं.
दरम्यान, या दोघांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर धनंजय पोवारने ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमानंतर स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी अलीकडेच गॉगल आणि चष्मा विक्रीचा नवा उपक्रम सुरू करत पहिल्या दुकानाचं उद्घाटन भव्य पद्धतीने केलं.
हे पण वाचा.. ‘सैराट’ फेम Tanaji Galgunde गावात करतोय शेती; स्वतःच्या हातांनी बनवतो जेवण, चाहत्यांनी केल कौतुक
तर अंकिता वालावलकर म्हणजेच ‘कोकण हार्टेड गर्ल’ सोशल मीडियावर सक्रिय असून ती अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असते. काही दिवसांपूर्वी तिने सूरज चव्हाणच्या घरी भेट दिली होती आणि यावेळी सूरजने त्याच्या होणाऱ्या पत्नीची ओळख अंकिताशी करून दिली होती.
भाऊ-बहिणीतील छोट्या गोंधळावरून निर्माण झालेली ही भावनिक पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार यांचं गोड नातं पाहून ‘बिग बॉस मराठी’मधील त्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
हे पण वाचा.. निळू फुलेंबद्दल बोलताना भावूक झाले सयाजी शिंदे -“या क्षेत्रातले आमचे खरे बाप तुम्हीच”
ankita walawalkar dhananjay powar bhaubeej post










