ADVERTISEMENT

‘सैराट’ फेम Tanaji Galgunde गावात करतोय शेती; स्वतःच्या हातांनी बनवतो जेवण, चाहत्यांनी केल कौतुक

tanaji galgunde farming and cooking in village : ‘सैराट’मधून प्रसिद्ध झालेला Tanaji Galgunde आजही आपल्या मातीशी घट्ट जोडलेला आहे. शेतात काम करताना आणि पारंपरिक पदार्थ बनवताना त्याच्या साधेपणाने चाहत्यांची मनं पुन्हा जिंकली आहेत.
tanaji galgunde farming and cooking in village

‘tanaji galgunde farming and cooking in village : सैराट’ या ऐतिहासिक ठरलेल्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता Tanaji Galgunde पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटसृष्टीतील व्यग्र आयुष्य असूनही तानाजी आजही आपल्या मातीशी जोडलेला आहे. अलीकडेच त्यानं आपल्या गावात शेतात घाम गाळतानाच एक खास पारंपरिक पदार्थ बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यावर चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

‘सैराट’ चित्रपटाला जवळपास दहा वर्षे पूर्ण होत आली असली तरी या सिनेमाची जादू आजही तितकीच प्रभावी आहे. आर्ची-परशा सोबतच ‘लंगड्या’ या भूमिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा Tanaji Galgunde आता एक उत्तम अभिनेता आणि तितकाच साधा शेतकरी म्हणूनही ओळखला जातो.

अलीकडेच तानाजीनं आपल्या शेतात घोसावळ्याची भाजी बनवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. त्यानं शेतातच उगवलेले घोसावळे स्वच्छ धुऊन, शेंगदाणे, खोबरं आणि मिरचीचं सारण वापरून भाजी तयार केली. खास बाब म्हणजे, ही भाजी त्यानं गॅसवर नव्हे तर दगडांच्या चुलीवर केली. त्यानंतर शेताच्या बांधावर झाडाखाली बसून त्यानं ही भाजी निवांतपणे चाखली. तानाजीचा हा साधेपणा आणि मातीशी नातं जोडणारं हे दृश्य पाहून प्रेक्षक भावूक झाले.

तानाजीनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी त्याच्या साधेपणाचं कौतुक केलं, तर काहींनी “आम्हीसुद्धा ही भाजी बनवून बघणार” असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. आधुनिक जीवनशैलीतही ग्रामीण संस्कृती आणि परंपरा जपणारा तानाजीचा हा दृष्टिकोन अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

अभिनय कारकिर्दीकडे पाहिलं तर Tanaji Galgunde ‘सैराट’ नंतर ‘झुंड’, ‘फ्री हिट दणका’, ‘गस्त’, ‘एकदम कडक’ आणि ‘घर बंदूक बिर्याणी’सारख्या चित्रपटांमध्ये झळकला आहे. तसेच ‘नवरदेव बी.एस.सी. अॅग्री’मध्ये त्यानं मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलं.

हे पण वाचा.. निळू फुलेंबद्दल बोलताना भावूक झाले सयाजी शिंदे -“या क्षेत्रातले आमचे खरे बाप तुम्हीच”

सध्या तानाजीच्या पुढच्या प्रोजेक्टबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी त्याचे चाहते त्याच्या नव्या भूमिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनय, शेती आणि साधेपणाचं सुंदर मिश्रण असलेला Tanaji Galgunde आजही प्रेक्षकांच्या मनात ‘सैराट’चा लंगड्या म्हणून कायम अधिराज्य गाजवत आहे.

हे पण वाचा.. सई ताम्हणकर आणि क्रिती सनॉनची स्पेशल दिवाळी: ‘परमसुंदरी’ रियुनियनचा क्षण

tanaji galgunde farming and cooking in village