Prajakta Gaikwad Jagran Gondal: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि उद्योजक शंभूराज खुटवड नुकतेच विवाह बंधनात अडकले, लग्नानंतर या कपलने पारंपरिक विधींना विशेष महत्त्व दिलं असून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत.
लग्नसोहळ्यानंतर प्राजक्ता आणि शंभूराज यांनी सर्वप्रथम आपल्या कुटुंबासह जेजुरीमध्ये खंडेरायाचे दर्शन घेतले. नवविवाहित जोडप्याने शेअर केलेल्या या खास व्हिडिओमध्ये दोघांचाही साधेपणा आणि श्रद्धा दिसून आली. याच उत्साहात आता त्यांच्या घरी झालेल्या जागरण गोंधळाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मराठमोळ्या पद्धतीने साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमात प्राजक्ता पूर्णतः पारंपरिक वेशात सहभागी झाल्याने चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं. अभिनेत्री असूनही तिने खऱ्या मराठी मुलीप्रमाणे सर्व विधींमध्ये मनापासून सहभाग घेतल्याचं दिसून आलं. कुटुंबीयांसोबत झालेल्या या पारंपरिक साजऱ्या वातावरणाचा दोघांनीही मनमुराद आनंद लुटला.
सविस्तर ईथे पहा:लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी पोहोचली प्राजक्ता गायकवाड फटाके, रांगोळी आणि ओवाळणीने कुटुंबीयांनी केले स्वागत
Prajakta Gaikwad Jagran Gondal नंतरचे असे खास क्षण पाहिल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्राजक्ता आणि शंभूराज यांची केमिस्ट्री, त्यांचा साधेपणा आणि परंपरांबद्दल असलेला आदर यामुळे हे जोडपं सध्या चर्चेत आहे. त्यांच्या लग्नानंतरचे प्रत्येक अपडेट्स चाहत्यांना आनंद देत असून या स्टार कपलचे नवे क्षण पुढेही अशाच उत्साहात पाहायला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









