tarini yuvraj kedar bapurao jamkhande navin twist : ‘तारिणी’ या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत सध्या तपासाची दिशा सतत बदलताना दिसत आहे. प्रत्येक भागात समोर येणाऱ्या नव्या घडामोडींमुळे कथानक अधिकच रंजक बनले आहे. अलीकडेच जेजेने युवराजला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. आता नव्या प्रोमोमध्ये आणखी एक धक्कादायक प्रसंग पाहायला मिळत असून, युवराजवरील संशय आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
गुलाब या गुन्हेगाराशी संबंध असल्याच्या संशयावरून युवराजला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यावेळी जेजेने घरातील सदस्यांकडेही चौकशी करत गुलाब आणि युवराजला एकत्र पाहिलं होतं का, असा प्रश्न विचारला. सुरुवातीला सर्वांनी याबाबत नकार दिला. मात्र तारिणीने गुलाबला युवराजच्या खोलीत पाहिल्याचं सांगितल्याने तपासाला नवं वळण मिळालं.
युवराजला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबातही तणावाचं वातावरण निर्माण होतं. अनेकांनी या घडामोडींसाठी तारिणीला जबाबदार धरलं. तर दुसरीकडे कौशिकीने युवराजची बाजू घेत त्याला निर्दोष असल्याचा विश्वास व्यक्त केला. ती वकिलांसह जेजेकडे पोहोचते आणि त्याची सुटका करण्याचा प्रयत्न करते. मात्र गुलाबचा फोटो पाहिल्यानंतर तिला तो युवराजच्या लग्नात उपस्थित असल्याचं आठवतं. तरीही केवळ ओळख असल्याने युवराज गुन्हेगार ठरत नाही, असं तिचं मत असतं.
हे पण वाचा.. कमळी मध्ये मोठा ट्विस्ट! हॉस्टेल सोडण्याची वेळ आली; हृषीने घेतलेल्या निर्णयामुळे नयनतारासमोर नवी अडचण
आता समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये कथानक आणखी रंगतदार झाल्याचं दिसत आहे. राजकारणी बापूराव जामखंडे पुन्हा एकदा कथेत सक्रिय झाले असून ते थेट केदारच्या कार्यालयात पोहोचतात. बातमी देण्यासाठी नव्हे, तर बातमी घडवण्यासाठी आलो आहोत, असं सांगत ते थेट चर्चेचं वातावरण तयार करतात.
लाईव्ह सुरू असतानाच बापूराव जामखंडे केदारला युवराज आणि गुलाब यांच्या संबंधांबाबत थेट प्रश्न विचारतात. त्या प्रश्नाला उत्तर देताना केदार दोघांमध्ये संबंध असल्याचं मान्य करतो. केदारच्या या उत्तराने कौशिकीसह उपस्थित सर्वजण हादरून जातात. यामुळे युवराजभोवतीचा संशयाचा फास आणखी घट्ट होणार असल्याचे संकेत प्रोमोमधून स्पष्टपणे मिळत आहेत.
झी मराठीने हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. युवराज खरोखरच या संपूर्ण प्रकरणात गुंतलेला आहे की तो मोठ्या कटाचा बळी ठरत आहे, याबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. आगामी भागांमध्ये तपास कोणत्या दिशेने पुढे सरकतो आणि युवराजला या आरोपांतून दिलासा मिळतो की आणखी संकटांना सामोरं जावं लागतं, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा .. ठरलं तर मग मध्ये धक्कादायक कट! प्रियासोबत नागराजही बाहेर, सायली-अर्जुनला अडकवण्यासाठी रचला नवा डाव









