kamali big twist aabanchya nidhanache satya samor emotional promo : झी मराठीवरील लोकप्रिय ‘कमळी’ मालिकेत आता अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी घडामोडी पाहायला मिळणार आहेत. मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांना अक्षरशः भावुक केलं असून कमळीच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य तिच्यासमोर येणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिक्षणासाठी मुंबईत राहणारी कमळी आता आपल्या गावात परतणार आहे. मात्र, तिच्या परतीसोबतच तिच्या आयुष्यात एक मोठं वादळ येणार असल्याचं चित्र दिसत आहे.
कमळीने आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवलं आहे. मुंबई विद्यापीठातून ती प्रथम आल्याने तिच्या कुटुंबासह संपूर्ण गावाला तिचा अभिमान वाटत आहे. मुंबईला जाताना तिने आपल्या आबांना मोठं होण्याचं आणि भरपूर अभ्यास करण्याचं वचन दिलेलं असतं. हेच स्वप्न पूर्ण करून ती आनंदाने गावाकडे निघते. मात्र, या आनंदामागे एक मोठं दुःख दडलेलं असतं, याची तिला अजिबात कल्पना नसते.
कमळीच्या आयुष्यात आबांचं स्थान खूप महत्त्वाचं असतं. त्यांच्यावर तिचा प्रचंड जीव असतो. पण, आबांचं निधन झाल्याचं सत्य तिच्यापासून तब्बल वर्षभर लपवून ठेवण्यात आलेलं असतं. कमळी हे दुःख सहन करू शकणार नाही आणि तिच्या शिक्षणावर परिणाम होईल या भीतीने सरोजने हा निर्णय घेतलेला असतो. त्यामुळे कमळीला आजोबा या जगात नाहीत हे माहीतच नसतं.
दरम्यान, कमळी गावात येऊ नये यासाठी बंड्या आणि हृषी प्रयत्न करताना दिसतात. तरीही शेवटी कमळी आणि निंगी गावात पोहोचतात. गावात आल्यानंतर तिचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं. ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत गावकरी तिच्या यशाचा आनंद साजरा करतात. कमळीला फेटा बांधून तिची मिरवणूकही काढली जाते. एका बाजूला आनंदाचं वातावरण असताना दुसऱ्या बाजूला गावात आबांच्या वर्षश्राद्धाची तयारी सुरू असते.
गावाच्या विकासासाठी योगदान दिलेल्या आबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गावभर बॅनर लावलेले असतात. याच मिरवणुकीदरम्यान कमळीची नजर अचानक त्या बॅनरवर पडते आणि एका क्षणात तिच्या आनंदावर विरजण पडतं. चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं होतं आणि ती अक्षरशः कोसळते. आजोबा आपल्याला कायमचे सोडून गेलेत आणि ही गोष्ट आपल्याला इतके दिवस माहितीच नव्हती, याचा तिला मोठा मानसिक धक्का बसतो.
हे पण वाचा.. स्वानंदीचा संताप अनावर! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य उघड होताच अंशुमन अडचणीत; समरने दिला अंतिम इशारा
kamali big twist aabanchya nidhanache satya samor emotional promo
प्रोमोमध्ये कमळी जमिनीवर बसून अश्रूंना वाट मोकळी करून देताना दिसत आहे. त्यामुळे मालिकेतील पुढील भाग अधिक भावनिक होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता सरोज आपल्या लेकीला कसं सावरणार? तसेच कमळीच्या वडिलांबाबतचं सत्य तिच्यासमोर येणार का? ती नेमकी कोणाची नात आहे, हा प्रश्नही पुन्हा चर्चेत आला आहे.
हे पण वाचा.. कमळीचा मोठा विजय! 96.40% गुणांसह मुंबई विद्यापीठात प्रथम, अनिकाला बसला जबरदस्त धक्का
‘कमळी’ मालिकेतील हा विशेष भाग ५ आणि ६ जून रोजी रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार असून प्रेक्षकांमध्ये या भागाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.









