ADVERTISEMENT

त्याच्या मनात जे असतं ते तो लगेच बोलतो, पूर्वा कौशिकने सांगितली प्रसाद जवादेची खास सवय

purva kaushik on prasad jawade nature deep jyoti serial interview : झी मराठीवरील “दीप-ज्योती” मालिकेमुळे चर्चेत आलेल्या पूर्वा कौशिक आणि प्रसाद जवादे यांनी एकमेकांच्या स्वभावाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. “तो मनात काही ठेवत नाही”, असं म्हणत पूर्वाने प्रसादच्या खेळकर स्वभावाचं कौतुक केलं.
purva kaushik on prasad jawade nature deep jyoti serial interview

purva kaushik on prasad jawade nature deep jyoti serial interview : झी मराठीवरील “दीप-ज्योती” ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेतील भावनिक कथा, सतत येणारे नवे ट्विस्ट आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे ही मालिका चर्चेचा विषय ठरली आहे. या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक ‘ज्योती’ची भूमिका साकारत असून अभिनेता प्रसाद जवादे ‘दीप’च्या भूमिकेत दिसत आहे. पडद्यावर सतत भांडणं आणि मतभेद दाखवले जात असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र दोघांची मैत्री आणि एकमेकांबद्दलचा आदर वेगळ्याच पातळीवर असल्याचं पाहायला मिळालं.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान पूर्वा आणि प्रसाद यांनी एकमेकांच्या स्वभावाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी दोघांनाही प्रश्न विचारण्यात आला की, एकमेकांमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी त्यांना सर्वात जास्त आवडते? त्यावर प्रसादने पूर्वाबद्दल बोलताना तिच्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं. “ती जे काही बोलते ते समोरच बोलते. मनात काही ठेवत नाही. मला अशी माणसं आवडतात. पाठीमागे बोलणारे लोक डोक्याला त्रास देतात,” असं तो म्हणाला.

प्रसादच्या या वक्तव्यानंतर पूर्वानेही त्याच्याबद्दल बोलताना त्याच्या उत्स्फूर्त स्वभावाचा उल्लेख केला. “तोही अगदी तसाच आहे. त्याच्या मनात जे येतं ते तो लगेच बोलून टाकतो. आपण अनेकदा विचार करतो की हे बोलावं का नाही, पण तो अजिबात विचार करत नाही. त्याच्यातली ही सहजता आणि खेळकर वृत्ती मला खूप आवडते,” असं पूर्वाने सांगितलं. त्यांच्या या संवादामुळे दोघांमधील मैत्री आणि सेटवरील वातावरण किती सकारात्मक आहे, याची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली.

“दीप-ज्योती” मालिकेची कथा सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. एका अपघातामुळे दीप आणि ज्योतीच्या कुटुंबाचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. दीपच्या भावाकडून झालेल्या अपघातात ज्योतीच्या भावाचा आणि तिच्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू होतो. मात्र हा गुन्हा दीप स्वतःवर घेतो. या घटनेनंतर मालिकेत अनेक भावनिक घडामोडी घडताना दिसत आहेत. ज्योती घराची जबाबदारी सांभाळताना दिसते, तर तिची बहीण सूडाच्या भावनेतून वेगळा निर्णय घेते. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक भागात नवं नाट्य पाहायला मिळत आहे.

पूर्वा कौशिक याआधी “शिवा” मालिकेत झळकली होती. त्या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. आता “दीप-ज्योती”मधील तिची व्यक्तिरेखा पूर्णपणे वेगळी असल्याने चाहत्यांकडून तिच्या अभिनयाचं पुन्हा एकदा कौतुक होत आहे. दुसरीकडे, प्रसाद जवादे “पारू” मालिकेतून घराघरात पोहोचला होता. त्याने साकारलेला आदित्य हा प्रेमळ आणि कुटुंबासाठी झटणारा मुलगा प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला.

हे पण वाचा.. ठरलं तर मगच्या ३ अभिनेत्री पोहोचल्या शेगावला; जुई गडकरी म्हणाली, त्यांनी बोलावल्याशिवाय जाणं होत नाही!

purva kaushik on prasad jawade nature deep jyoti serial interview

दरम्यान, “दीप-ज्योती” मालिकेत पुढे कोणते नवे ट्विस्ट येणार आणि दीप-ज्योतीच्या नात्यात नेमकं काय घडणार, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

हे पण वाचा.. वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये प्रेमाचा मोठा ट्विस्ट! स्वानंदीनं अखेर समरसमोर व्यक्त केल्या भावना