deepjyoti maliket vadhu pariksha sulu aatya preeti test promo : झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका “दीपज्योती” सध्या प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण करत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला मालिकेचा नवीन प्रोमो विशेष चर्चेत आला असून त्यात गायकवाड कुटुंबातील वधू परीक्षेचा एक अनोखा आणि तणावपूर्ण प्रसंग दाखवण्यात आला आहे.
या प्रोमोमध्ये ज्योती आणि पूर्वा गायकवाडांच्या घरी पोहोचतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे प्रीतीची वधू परीक्षा. ही परीक्षा घेण्याची जबाबदारी घरातील सुलोचन म्हणजेच सुलु आत्या यांच्या हातात असते. सुलु आत्या प्रीतीची संयम आणि सहनशीलता तपासण्यासाठी वेगवेगळ्या अजब पद्धतींचा वापर करताना दिसतात.
सुरुवातीला त्या प्रीतीला खुर्चीवर बसायला सांगतात. प्रीती शांतपणे बसते, मात्र अचानक खुर्चीचा पाय मोडतो आणि ती जमिनीवर पडते. या अपघातात तिच्या हाताला लागते, तरीही ती काहीही प्रतिक्रिया देत नाही. तिचा संयम पाहून सुलु आत्या आणखी पुढील चाचणी घेतात. त्या तिला सोफ्यावर बसायला सांगतात, पण त्या सोफ्यावर आधीच माती पसरवलेली असते. प्रीती बसताच तिचे कपडे आणि हात मातीने खराब होतात, तरीही ती शांत राहते.
यानंतर सुलु आत्या चहाची मागणी करतात. मात्र त्या चहामध्ये साखरेऐवजी मीठ टाकलेले असते. हे सगळं पाहूनही प्रीती कोणतीही तक्रार करत नाही, कारण तिला माहिती असतं की ही एक परीक्षा आहे. तिचा हा संयम सुलु आत्याच्या कसोटीचा मुख्य भाग असतो.
दुसरीकडे, दीप आणि ज्योती हे सर्व लपून पाहत असतात. दीप आश्चर्याने म्हणतो की “ही परीक्षा आहे की छळ?” त्यावरून त्याची नाराजी स्पष्ट दिसते. ज्योतीला मात्र दरवाजा पलीकडे काय चाललं आहे हे नीट दिसत नाही, त्यामुळे ती अधिकच गोंधळते. दीप तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांच्यात हलकासा विनोदी वादही रंगतो.
हे पण वाचा.. ठरलं तर मग मधून प्रिया होणार बाहेर? अखेर प्रियांका तेंडोलकरनेच सांगितलं पुढे काय घडणार!
deepjyoti maliket vadhu pariksha sulu aatya preeti test promo
या संपूर्ण प्रसंगामुळे मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता वाढली आहे. प्रीती ही परीक्षा पार करेल का, आणि सुलु आत्या आणखी कोणत्या कसोट्या घेतील, हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.
हे पण वाचा.. स्वानंदी सरदेसाईचा समुद्रकिनाऱ्यावर रोमँटिक अंदाज; गुलाबी साडीतील मोहक लूकने चाहत्यांना घातली भुरळ









