sai kalyankar daughter name nabha barsan ceremony : मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय ठरलेली “कमळी” मालिकेतील अभिनेत्री सई कल्याणकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंदाच्या क्षणांमुळे चर्चेत आहे. लग्नानंतर तब्बल चार वर्षांनी आई झालेल्या सईने अलीकडेच आपल्या चिमुकल्या लेकीचं बारसं मोठ्या उत्साहात पार पाडलं. या सोहळ्याचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांनाही या आनंदात सहभागी करून घेतलं.
१० मार्च २०२६ रोजी सईला कन्यारत्न प्राप्त झालं होतं. ही आनंदाची बातमी तिने काही दिवसांनी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर आता लेकीच्या जन्मानंतर सव्वा महिन्याने पार पडलेल्या बारशात तिचं नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं. सईने आपल्या मुलीचं नाव ‘नभा’ असं ठेवलं आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये सई, तिचे पती आणि त्यांची लेक असे तिघे दिसत असले तरी मुलीचा चेहरा त्यांनी अद्याप जाहीर केलेला नाही. मात्र फोटोच्या पार्श्वभूमीत सुंदर सजावटीत ‘नभा’ हे नाव स्पष्टपणे दिसून येतं. आकाश आणि इंद्रधनुष्याच्या डिझाइनमध्ये साकारलेली ही सजावट विशेष लक्षवेधी ठरते.
‘नभा’ या नावाचा अर्थ आकाश किंवा गगन असा असून, विशालता, स्वातंत्र्य आणि निर्मळता यांचा तो प्रतीक मानला जातो. आजकाल अनेक पालक वेगळी आणि कठीण नावं ठेवण्याचा ट्रेंड फॉलो करताना दिसतात. मात्र सईने साधं, अर्थपूर्ण आणि गोड नाव निवडल्यामुळे चाहत्यांकडून तिचं विशेष कौतुक होत आहे.
सईने फोटो शेअर करताना “तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाने आम्ही आमच्या लेकीचं नाव जाहीर करत आहोत – नभा” असं भावनिक कॅप्शन दिलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत ‘नभा’ या नावाचंही भरभरून कौतुक केलं आहे.
हे पण वाचा.. वीण दोघातली तुटेना”मध्ये रंगणार किमया-स्वानंदीची पहिली भेट
सई कल्याणकरबद्दल बोलायचं झालं तर, डिसेंबर २०२१ मध्ये ती प्रशांत चव्हाण यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली होती. प्रशांत हे नॅनो केमिस्ट्रीमध्ये पीएचडी धारक आहेत. अभिनयाच्या क्षेत्रात सईने “कमळी”, “ठिपक्यांची रांगोळी” आणि “दख्खनचा राजा ज्योतिबा” यांसारख्या मालिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हे पण वाचा.. गिरीजा प्रभूचं हिंदी टीव्हीत पदार्पण; ‘तीस के पार जब मिला प्यार’मध्ये मुख्य भूमिका
sai kalyankar daughter name nabha barsan ceremony
आई झाल्यानंतर सईच्या आयुष्यातील हा नवा टप्पा तिच्यासाठी विशेष ठरत आहे. तिच्या लेकीचं नाव आणि बारशाचा साधा पण सुंदर सोहळा सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.









