ADVERTISEMENT

One Last Time…! ‘नशीबवान’ मालिकेचा शेवट; नेहा नाईकची भावुक पोस्ट

nashibwan marathi serial endingneha naik post : "स्टार प्रवाह" वरील "नशीबवान" मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला असून, मुख्य अभिनेत्री नेहा नाईकने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत या प्रवासाच्या आठवणी जागवल्या आहेत.
nashibwan marathi serial endingneha naik post

nashibwan marathi serial endingneha naik post : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मानल्या जाणाऱ्या “नशीबवान” या मालिकेने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. “स्टार प्रवाह” या वाहिनीवर प्रसारित होणारी ही मालिका सप्टेंबर २०२५ मध्ये सुरू झाली होती. मात्र अपेक्षित टीआरपी न मिळाल्यामुळे अवघ्या सात महिन्यांतच निर्मात्यांनी मालिकेला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. २५ एप्रिल रोजी दुपारी २:३० वाजता या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.

या मालिकेत अनेक अनुभवी कलाकारांची उपस्थिती होती. आदिनाथ कोठारे, अजय पूरकर आणि सोनाली खरे यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र या मालिकेचं विशेष आकर्षण ठरली ती अभिनेत्री नेहा नाईक. तिने पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आपली वेगळी छाप पाडली. याआधी ती “संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई” या चित्रपटातून झळकली होती.

मालिका संपल्यानंतर नेहा नाईकने सोशल मीडियावर “One Last Time…” अशी सुरुवात करत एक भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ती म्हणते, “आज ‘नशीबवान’चा प्रवास संपतोय. या सुंदर प्रवासात प्रेक्षकांनी आमच्यावर आणि गिरिजा या भूमिकेवर भरभरून प्रेम केलं. तुमच्या या पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.” तसेच तिने “स्टार प्रवाह”, दिग्दर्शक सतीश राजवाडे, कोठारे व्हिजन आणि आदिनाथ कोठारे यांचे विशेष आभार मानत, “माझ्यावर विश्वास ठेवून ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद” असेही नमूद केले.

हे पण वाचा.. तारिणी मालिकेत भावनिक ट्विस्ट! केदारने वाचवले बाबांचे प्राण, अखेर बापलेकांचा दुरावा संपला

मालिकेच्या शेवटच्या भागात प्रेक्षकांना उत्कंठावर्धक घडामोडी पाहायला मिळाल्या. कथानकानुसार, नागेश्वर गिरिजा आणि तिच्या आईला जिवंत जाळण्याचा कट रचतो. मात्र हा प्लॅन उलटतो आणि तो स्वतःच त्या आगीत अडकतो. दरम्यान, रुद्रप्रताप योग्य वेळी पोहोचून आपल्या पत्नीला वाचवतो. या सर्व गोंधळात गिरिजा नागेश्वरला सांगते की, ज्या कागदपत्रांसाठी हा सगळा प्रकार झाला ते कागद आतच राहिले आहेत. मालमत्तेच्या हव्यासापोटी नागेश्वर पुन्हा आगीत उडी घेतो आणि त्याचा तिथेच अंत होतो. या थरारक शेवटामुळे मालिकेला एक नाट्यमय पूर्णविराम मिळाला.

दरम्यान, “नशीबवान” संपल्यानंतर त्याच वेळेत म्हणजे दुपारी २:३० वाजता २७ एप्रिलपासून “तुझ्या सोबतीने” ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच सायंकाळी ६:३० वाजता “वचन दिले तू मला” ही मालिका सुरू होणार आहे.

हे पण वाचा.. सावळ्याची जणू सावली मालिकेत मोठा ट्विस्ट; सावलीच्या मदतीला पुन्हा येणार ‘बाबा’ जगन्नाथ

nashibwan marathi serial endingneha naik post

अल्पावधीत संपलेली असली तरी “नशीबवान” मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. विशेषतः नेहा नाईकच्या अभिनयाने आणि तिच्या पहिल्या मुख्य भूमिकेने अनेकांचे लक्ष वेधले. तिची ही भावनिक पोस्ट आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.